Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, November 3, 2014

ZP Yeotmal Recruitment Exam Paper Leak

ZP Yeotmal Recruitment 2014 Written Examination Paper Leak ? 


जिल्हा परिषदेतील चार संवर्गातील पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. सायंकळी या लेखी परीक्षेचा पेपर फुटल्याच्या वृत्तामुळे एकच खळबळ निर्माण झाली. अद्याप तरी पेपर फुटला की नाही हे स्थानिक पातळीवर निश्‍चित झाले नाही. मात्र या वृत्ताची पडताळणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचाली करण्यात येत आहेत.
जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी कृषी - २, कनिष्ठ अभियंता स्थापत्य - ७, कनिष्ठ अभियंता बांधकाम - २, कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा - १, प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ - १, तारतंत्री - १ या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष राहुल रंजन महिवाल यांच्या निगराणीतच ही प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली. सकाळी ९.३0 वाजता व्हीडिओ चित्रिकरणात त्या प्रश्नपत्रिकेचे वितरण करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच औरंगाबाद येथे वाडेकर क्लासेसचे दादासाहेब वाडेकर, परभणी आरटीओ कार्यालय व औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक येथील क्लार्क यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखा औरंगाबाद शहर पोलिसांकडून ११ इसमांची राज्यस्तरीय टोळी मध्यरात्री पकडण्यात आली. यामध्ये मुख्य सूत्रधार विक्रीकर निरीक्षक मकरंद मारोती खामणकर रा. औरंगाबाद, दादासाहेब वाडेकर (५0) रा. किनी, भागीनाथ साहेबराव गायके (३६) रा. शेगाव, क्लार्क औरंगाबाद को-ऑप बँक विनोद दत्तात्रय वडकर (४0), कनिष्ठ लिपिक आरटीओ कार्यालय परभणी पोपट नत्थु कराळे, महेश आनंदराव गायकवाड रा. धामणगाव रेल्वे जि. अमरावती, महादेव रामदास नायसे (२५) रा. बोरगाव मंजू जि. अकोला, सुरेश भीमराव आरसूळ (२२) रा. पराडा जि. जालना, काळूसिंग पन्नालाल नायमनी (२६) रा. शेगाव जि. औरंगाबाद, कैलास लिंबाजी सोनकांबळे (४२) रा. गौतम नगर जि. परभणी, सचिन वाल्मीकराव गायकवाड (३१) रा. नाथनगर जि. औरंगाबाद यांना औरंगाबाद शहर पोलिसांनी मध्यरात्री पाठलाग करून अटक केली. त्यांच्याजवळ हस्तलिखित असलेल्या उत्तरपत्रिका सापडल्या. पोलिसांनी त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यवतमाळातील स्थानिक कुठल्याही कर्मचार्‍याचा यात सहभाग असल्याबाबतचे उघड झालेले नाही. शिवाय या टोळीकडून विकण्यात आलेल्या उत्तरपत्रिका नेमक्या जिल्हा निवड समितीने काढलेल्या उत्तरपत्रिकेशी मिळत्याजुळत्या आहेत की नाही हे ही वृत्त लिहेपर्यंत निश्‍चित झाले नव्हते. (कार्यालय प्रतिनिधी) पेपर फुटला की नाही याची पडताळणी करण्यासाठी औरंगाबाद पोलिसांकडून माहिती मागविण्यात आली आहे. चार संवर्गासाठी ही लेखी परीक्षा घेण्यात आली. पेपर फुटल्याची स्थानिक पातळीवर कुठलीही तक्रार नाही. संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. औरंगाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींजवळच्या उत्तरपत्रिका नेमक्या कोणत्या पदाच्या आहेत याचा शोध घेण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..