Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, November 14, 2014

DISHA Computer Education Literacy Yojna 2014 - 2015

DISHA Computer Education Literacy Yojna 2014 - 2015


DISHA a New Central Government Scheme for the Computer Literacy. Aim of This Scheme to Make a 50 Lakh Peoples IT Literate. This is going to a 20 Hours Computer Learning Program in First Phase & in second Phase 50 Hours program.  

 खासगी प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून येत्या तीन वर्षांत देशातील सुमारे ५0 लाख लोकांना मुलभूत संगणक प्रशिक्षण देण्याची ५00 कोटी रुपयांची योजना केंद्र सरकारने आखली असून लवकरच ती मंजुरीसाठी मंत्रिमंडळापुढे नेण्यात येणार आहे.
या योजनेस 'दिशा' असे संभाव्य नाव ठरविण्यात आले असून ती निवडक जिल्ह्यांमध्ये राबविली जाईल, असे सांगून एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, देशातील 'डिजिटल दरी' भरून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात असलेल्या 'डिजिटल इंडिया' या महत्त्वाकांक्षी मिशनच्या यशासाठी ही संगणक साक्षरता योजना महत्वाची ठरणार आहे. यासाठी ज्यांना संगणकाचे जुजबी ज्ञानही नाही अशांना संगणक साक्षर करण्यासाठी २0 तासांचा एक संगणक शिक्षण अभ्यासक्रम तयार केला जाईल. हे प्रशिक्षण कोणत्या जिल्ह्यांमध्ये द्यायचे व कोणत्या खासगी संस्थांच्या मार्फत द्यायचे याची निवड सरकार करेल. प्रशिक्षण घेणार्‍या व्यक्तीने प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्या खासगी संस्थेस प्रत्येक प्रशिक्षार्थीमागे ५00 रुपये याप्रमाणे मेहताना दिला जाईल. यानंतरचा दुसर्‍या टप्प्याचा अभ्यासक्रम ५0 तासांचा असेल व त्यासाठी खासगी प्रशिक्षण संस्थेस प्रत्येक प शिक्षार्थीसाठी एक हजार रुपये दिले जातील.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..