Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Thursday, May 19, 2022

RTMNU Summer 2022 Exam Timetable

 RTMNU Summer 2022 Exam Timetable BA, BCom, BSc, BCA, BCCA 

Nagpur University Summer 2022 Examination Schedule or Timetable details are given below. The Examination Dates are declared by University Now. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेचा मुहूर्त निघाला असून ८ जूनपासून विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याचे विद्यापीठाचे ठरले आहे. पहिल्या टप्प्यात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहे. मात्र, परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन पद्धतीने होणार याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.


विद्यापीठाद्वारे यापूर्वी परीक्षा मंडळाच्या बैठकीत ऑनलाइन परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विद्यापीठाने तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी कुलगुरूंच्या बैठकीत, ऑफलाइनचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विद्यापीठाने लवकरात लवकर परीक्षेबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, याला वीस दिवसांपेक्षा जास्तीचा कालावधी उलटून गेल्यावरही विद्यापीठाकडून कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही.


आज विद्यापीठात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी बैठक घेतली. त्यामध्ये ९ जूनपासून परीक्षा घेण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये ८ जून पासून पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि १५ जूनपासून सर्वच पदव्युत्तर अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या परीक्षा, २२ जून पासून सर्वच अभ्यासक्रमातील सम सत्रांच्या परीक्षांचा समावेश करण्यात येणार आहे. अद्याप कोणत्या मोडवर परीक्षा घेण्यात येणार आहे, याबाबत कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थी अद्यापही संभ्रमात सापडले आहे.


Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..