Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, November 10, 2014

Maharashtra Board Supplementary Exam Oct 2014 Result

Maharashtra Board Supplementary Exam Oct 2014 Result 


Maharashtra Board October 2014 Examination result may declared on 20 November 2014. Large Number of students was appeared for this Supplementary examination. All Details about this result are given below. 

राज्य शिक्षण मंडळाच्या पूरक परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांमध्ये निकालासाठी उत्सुकता लागली आहे. विशेषत: दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. कारण या निकालावर त्यांचा ११ वीचा प्रवेश होणार आहे. हे विद्यार्थी मार्च २0१४ च्या परीक्षेत एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झाले होते.
बोर्डाच्या 'एटीकेटी' योजनेंतर्गत त्यांना ११ वीला प्रवेश मिळाला आहे. परंतु त्यांना मार्च २0१५ पर्यंत कुठल्याही परिस्थितीत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना आपण परीक्षेत उत्तीर्ण होणार असल्याचा आत्मविश्‍वास आहे. ते उत्तीर्ण झाल्यास त्यांना ११ वीत प्रवेशाबाबत काहीच अडचण राहणार नाही. पुरवणी परीक्षेत १0 वीचे १९ हजारापेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण परीक्षार्थ्यांपैकी ८ हजार परीक्षार्थ्यांनी 'एटीकेटी' नुसार ११ वीला प्रवेश घेतला आहे. दुसरीकडे १२ वीच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांमध्येही निकालाबाबत उत्सुकता आहे. विज्ञान अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना निकालाचे महत्त्व आहे. त्या विद्यार्थ्यांच्या मते निकाल सकारात्मक आल्यास त्यांना अभियांत्रिकीला प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या सीईटीमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. अशा परिस्थितीत ज्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्याची आशा आहे त्यांनी सीईटीची तयारी सुरू केली आहे. या बाबतीत बोर्डाच्या विभागीय कार्यालयाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी परीक्षेचे काम अंतिम टप्यात असून १८ ते २0 नोव्हेंबरपर्यंत निकाल लागू शकतो, अशी माहिती दिली. विभागीय सहायक सचिव श्रीराम चव्हाण यांनी निकालाची तारीख पुणे मुख्यालयाकडून ठरविण्यात येत असल्याचे सांगून विभागाचे काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. 

1 comment:

Anonymous said...

Sir SSC Result 2016 ki koi updates hain?

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..