Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Thursday, November 13, 2014

Nagpur University Winter 2014 Exam Postpone

Nagpur University Winter 2014 Exam Postpone


Nagpur University Winter 2014 Examination Are now postponed. All details & New timetable of Winter 2014 Examination, New Exam Dates details are given below:

सातत्याने बेजबाबदारपणा दाखविणार्‍या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हलगर्जीपणाचे आणखी एक उदाहरण सादर केले आहे. प्राध्यापकांवर वचक आणू न शकल्याने प्रश्नपत्रिकाच 'सेट' झाल्या नाही. त्यामुळे १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या परीक्षा 'पोस्टपोन' करण्याची अखेर विद्यापीठाने घोषणा केली. परंतु अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे बुधवारी रात्रीपर्यंत नवीन वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणखी वाढीस लागला आहे.
विधानसभा निवडणुकांमुळे विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना यंदा १0 दिवस उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे उर्वरित परीक्षा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी गंभीरतेने प्रयत्न होणे आवश्यक होते. परीक्षा विभागातील तत्कालीन अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळे प्राध्यापकांकडे लक्षच राहिले नाही अन् वेळेत प्रश्नपत्रिका 'सेट' झाल्याच नाहीत. नवीन परीक्षा नियंत्रक प्रशांत मोहिते यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर वेळापत्रक, इतर परीक्षा या बाबी मार्गी लावल्यानंतर हा मुद्दा त्यांच्या लक्षात आला. परंतु उशीर झाला असल्यामुळे नाईलाजाने 'सीबीएस' (क्रेडीट बेस सिस्टीम)पद्धतीच्या सर्व परीक्षा 'पोस्टपोन' कराव्या लागल्या.
'लोकमत'ने ही बाब प्रकाशित केल्यानंतर विद्यापीठाने यासंदर्भात संकेतस्थळावर अधिसूचना जारी केली. नवीन वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे असे यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र कुठल्याही परीक्षेचे नवीन वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर दिसतच नसल्याची विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे. विद्यापीठातील अधिकारी दिवसभर परीक्षा यंत्रणेच्या कामात व्यस्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..