Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, November 7, 2014

YCMOU Online Books Download PDF For Distance Course

YCMOU Online Books Download PDF For Distance Course

YCMOU Online Books are available for the download. 
प्रायोगिक तत्वावर सुरू केलेला हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके मिळविण्यासाठी होणारा विलंब व कागदावर होणारा खर्च टाळण्यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे, असे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नांदेड विभागीय केंद्राचे संचालक डॉ. पी. एम. शिंदे यांनी सांगितले. चापोली : ज्ञानगंगा घरोघरी असे ब्रीदवाक्य असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके आपल्या संकेतस्थळावर ऑनलाईन केली आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
शिक्षणापासून वंचित राहणार्‍यांना पुन्हा शिक्षण घेता यावे आणि त्यांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर अध्ययन साहित्य विद्यापीठामार्फत पुरवण्यात येते. त्यासाठी विद्यार्थ्यांना बराच वेळ प्रतिक्षा करावी लागते. विद्यापीठाकडून आलेली ही पुस्तके संबंधित अभ्यास केंद्रावर जाऊन आणावी लागतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना चकराही कराव्या लागतात. विद्यार्थ्यांना हा त्रास होऊ नये म्हणून विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी अध्ययन साहित्य विनामुल्य इंटरनेटवर उपलब्ध करून दिले आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हे साहित्य पहावयास मिळणार आहे. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने 'ज्ञानगंगा घरोघरी' पोहचविण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत होत आहे.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..