Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Sunday, March 2, 2014

Maharashtra SSC 2014 Examination

Maharashtra SSC 2014 Examination, 10th Examination 2014राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांना जारी केलेल्या ओळखपत्रात अनेक चुका व घोळ आहे. त्याचा गैरफायदा घेऊन परीक्षेत बोगस विद्यार्थी बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे येत्या ३ मार्चपासून सुरू होत असलेल्या दहावीच्या परीक्षेवर बोगस विद्यार्थ्यांचे भय निर्माण झाले आहे. दुसरीकडे विभागीय परीक्षा मंडळाने अशा बोगस विद्यार्थ्यांवर नजर ठेवण्यासाठी खास योजना आखून शाळा मुख्याध्यापकांना विशेष निर्देश दिल्याची माहिती आहे. 
माहिती सूत्रानुसार परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांना जारी केलेल्या अनेक ओळखपत्रात चुकीच्या विद्यार्थ्यांचे छायाचित्र लागले असून, नावातही मोठय़ा प्रमाणात घोळ झाला आहे. शिवाय मंडळाकडे असलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या माहितीचा 'डाटा करप्ट' झाला आहे. त्यामुळे सध्या परीक्षा मंडळाकडे संबंधित विद्यार्थ्यांच्या छायाचित्रांसह कोणतीही माहिती उपलब्ध नाही. अशा स्थितीत परीक्षा मंडळ बोगस विद्यार्थ्यांचा शोध कसा घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विभागीय परीक्षा मंडळाकडून गत २५ फेब्रुवारी रोजी सर्व शाळांच्या प्राचार्यांना विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र वाटप करण्यात आले आहे. यासंबंधी मंडळाचे विभागीय सचिव अनिल पारधी यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी बोगस विद्यार्थ्यांंना पकडण्यासाठी सध्या तरी मंडळाकडे कोणतीही यंत्रणा नसल्याचे मान्य केले. परंतु परीक्षा केंद्रावरील निरीक्षकांना यासंबंधी सतर्क राहण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..