ICSI Company Secretaries (CS) Results 2014 | RTM Nagpur University Today's Summer 2014 New Result | BE 5th Semester Summer 2014 Result RTMNU | B.Sc. Part 2 Summer 2014 Result RTMNU | Nagpur University BE 6th Semester Summer 2014 Result | BE 4th Semester Summer 2014 Result RTMNU | DTE Poly Admission 2014 CAP Round 2 Allotment

Search Any Result / Job :

Sunday, December 15, 2013

Sukanya Yojana Maharashtra Details, Application Process

Sukanya Yojana Maharashtra Details, Application Process

Sukanya Yojana Maharashtra Details 2014
 सुकन्या योजना महाराष्ट्र 
Sukanya Yojana is the government scheme by Maharashtra Government For the BPL Families Female Child. Under this scheme a Female children can get Insurance of Rupees 1 Lakh which will be awarded after completion of 18 Years of age of girl. More details of this Sukanya Yojana Maharashtra are given Belwo in Marathi.  

 सुकन्या योजना महाराष्ट्र  : महाराष्ट्र राज्यातील दारिद्रय रेषेखाली जन्मणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नावे जन्मत: रु.21,200 मुलीच्या जन्माच्या एक वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून सदर मुलीस वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकूण रु.1 लाख इतकी रक्कम प्रदान करण्यात येईल. सदरची 1 लाख इतकी रक्कम ही प्रचलित व्याजदारानुसार व 18 वर्षे कालावधीसाठी परिगणित करण्यात आली आहे. सदर योजनेत अतिरिक्त लाभ म्हणून सदर योजनेसह आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजना व त्यात समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेचा सुध्दा लाभ देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण व आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रुण हत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बाल विवाह रोखणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यात सुकन्या योजना जानेवारी 2014 पासून सुरु केली जाणार आहे.


 सुकन्या योजना महाराष्ट्र योजनेचे स्वरुप Details of Sukanya Yojana 2013 - 2014

सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी ही योजना राबविणे प्रस्तावित आहे. मुलीचा जन्म झाल्यावर तिची जन्मनोंद सर्वसाधारणपणे एक वर्षाच्या आत ग्राम पंचायतीमध्ये अथवा नगरपालिका, महानगरपालिका कार्यालयात करण्यात येते. महाराष्ट्र राज्यातील दारिद्रय रेषेखाली जन्मणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नावे जन्मत: रु 21,200 मुलीच्या जन्माच्या एक वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून सदर मुलीस वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकूण रु.1 लाख इतकी रक्कम प्रदान करण्यात येईल. सदरची 1 लाख इतकी रक्कम ही प्रचलित व्याजदारानुसार व 18 वर्षे कालावधीसाठी परिगणित करण्यात आली आहे. सदर योजनेत अतिरिक्त लाभ म्हणून सदर योजनेसह आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजना व त्यात समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेचा सुध्दा लाभ देण्यात येणार आहे.

आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजनेंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रक्कमेतून (रुपये 21,200/-) नाममात्र रु 100 प्रतिवर्ष इतका हप्ता जमा करुन सदर मुलीच्या कमवित्या पालकाचा विमा उतरविला जाईल. ज्यात पालकाचा नैसर्गिक मृत्यु वा अपघात अशी परिस्थिती ओढविल्यास रुपये 30 हजार, अपघातामुळे मृत्यू, अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास रुपये 75 हजार, दोन डोळे अथवा दोन अवयव अथवा एक डोळा व एक अवयव (अपघातामुळे) निकामी झाल्यास रु 75 हजार तसेच एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास रु 37,500 इतकी रक्कम दिली जाणार आहेत.

.त्याचप्रमाणे आम आदमी विमा योजनेंतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेंतर्गत सदर मुलीला रुपये 600 इतकी शिष्यवृत्ती, प्रती 6 महिने इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि इयत्ता बारावी मध्ये शिकत असतांना दिली जाणार आहे.

18 वर्षाच्या आत मुलीचा विवाह अथवा मृत्यू झाल्यास, या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नाही. मुलीच्या नावे बँक खात्यात जमा असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाच्या नांवे असणाऱ्या Surplus अकाऊंट किंवा खात्यात जमा होईल.

भारतीय आयुर्विमा महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या नावे एक नविन पॉलिसी काढणार असून ज्यामध्ये प्रत्येक लाभार्थी मुलींसाठी स्वतंत्र खाते असणार आहे. मुलीच्या नावे असलेल्या एकत्रित निधी (Corpus) रु 1 लक्ष पेक्षा अधिक झाल्यास, जादाची रक्कम सरप्लस खात्यात जमा होईल. मुलीचा विवाह अथवा मृत्यू झाला तर मुलीच्या खात्यातील रक्कम शासनाच्या खात्यावर जमा होईल. मात्र सर्व अटी व शर्तीसह मुलीच्या Corpus मध्ये रु. 1 लक्ष पेक्षा कमी रक्कम असल्यास, उर्वरित रक्कम शासनाच्या Surplus खात्यातून मुलीच्या खात्यात जमा केली जाईल.

 सुकन्या योजनेसाठी सर्वसाधारण अटी व शर्ती Conditions About Sukanya Yojana
सदर योजना सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलींसाठी कुटूंबातील फक्त दोन अपत्यांपर्यत लागू असेल.
सदर मुलीचे आई- वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होणे आवश्यक राहील. तिने इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण असणे व 18 वर्षापर्यंत अविवाहित असणे आवश्यक राहील.
दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जर जुळया मुली झाल्या, तर त्या दोन्ही मुली योजनेस पात्र असतील.
एखाद्या परिवाराने अनाथ मुलीस दत्तक घेतले असेल तर सदर मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. परंतु सदर लाभ प्राप्त होण्यासाठी दत्तक मुलीचे वय 0 ते 6 वर्ष इतके असावे.
बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना अनुज्ञेय आहे.
लाभार्थी कुटुंबांना दोन अपत्यांच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.

अर्ज असा कराल  सुकन्या योजना महाराष्ट्र How to Apply For Sukanya Yojana
मुलीचा जन्म झाल्यावर तिचे नांव नोंदविल्यावर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविका / मुख्य सेविका / बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे अर्ज करता येईल.
सदर अर्ज प्राप्त झाल्यावर त्याची एक महिन्यांच्या आत पडताळणी करुन बाल विकास अधिकारी संबंधित विभागातील आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधतील.
अर्जाबरोबर आई-वडील राज्याचे मूळ रहिवाशी असल्याचा पुरावा, आणि जन्म नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्रय रेषेखालील असल्याचा पुरावा (रेशनकार्ड / उत्पन्नाचा दाखला) इ. कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.


No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..