Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, December 30, 2013

Cast Validity BARTI 2014 Admission

Cast Validity BARTI 2014 Admission



विद्यार्थी आणि पालकांसाठी डोकेदुखी ठरणारे जातपडताळणी प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी) यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेपूर्वीच वितरित करण्यात येईल. यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) च्या वतीने विशेष नियोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे महासंचालक डी.आर.परिहार यांनी दिली.
प्रवेशाची अंतिम तारीख उलटूनही आरक्षित कोट्यांतर्गत प्रवेश मिळविणार्‍यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याची दरवर्षी ओरड होते. या वादावर कायमचा तोडगा काढण्याचा निर्णय सामाजिक व न्याय विभागाने घेतला आहे. यात बार्टी समन्वयकाची भूमिका बजविणार आहे. 
राज्यात वर्षाकाठी २ ते २.५0 लाख जात पडताळणी प्रमाणपत्रे वितरित केली जातात. मात्र गत १३ महिन्यात ही आकडेवारी ८ लाखापर्यंत गेली असल्याचे परिहार यांनी सांगितले. लहानसहान कारणावरून विद्यार्थ्यांचे दावे अडवून ठेवणे, दलाल आणि काम करण्याची पारंपरिक सरकारी पद्धत दावे प्रलंबित असल्यामागील कारण होते. यात तोडगा काढण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. ज्या दावेदाराचे दावेपरिपूर्ण असतील, त्यांना तत्काळ प्रमाणपत्र देण्याच्या सूचना राज्य सरकारच्यावतीने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 
याशिवाय बोगस जात पडताळणी प्रमाणत्र वापरणार्‍यांना आणि ते उपलब्ध करून देणार्‍यांना चाप बसण्यासाठी प्रमाणपत्रात लवकरच बदल करण्यात येतील. यात कोड पद्धत आणि वॉटर लोगोचा प्रामुख्याने वापर करण्यात येणार आहे. जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करणे शक्य असल्याने विद्यार्थ्यांनी barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळाची मदत घ्यावी. यासोबत विज्ञान शाखेत आणि व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचेच दावा अर्ज पडताळणी समितीकडून तपासले जाणार आहे. त्यामुळे कला, वाणिज्य आणि इतर शाखांत शिक्षण घेत असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी अर्ज करू नये.
यासोबतच संबंधित शैक्षणिक संस्थांनी या विद्यार्थ्यांचे जात पडताळणी अर्ज समितीकडे पाठवू नये, असे बार्टीच्यावतीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात सांगण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..