Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Tuesday, December 2, 2014

MBBS E&T Re Examination 5 Dec 2014

MBBS E&T Re Examination 5 Dec 2014


MBBS Third Year E&T Exam Paper विषयाच्या पेपरफुटीची विद्यापीठाने दखल घेतली असून ५ डिसेंबरला 2014 या विषयाची फेरपरीक्षा होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी दिली.
लातूर येथील पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर विद्यापीठाने तत्काळ या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. विद्यापीठाने परीक्षा मंडळाची तातडीने बैठक बोलावून पेपरफुटीवर चर्चा केली होती. तसेच संबंधित केंद्राला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.
विद्यापीठाने नाशिकमध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सायबर क्राइमकडे सोपवावा, अशी मागणीही केली आहे. विद्यापीठाने व्हॉटस् अपवरील 'ते' प्रश्नदेखील हस्तगत केले असून, त्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
विद्यापीठ एकीकडे फेरपरीक्षा घेत असताना व्हॉट्स अपवर फिरणारे ते प्रश्न प्रश्नपत्रिकेतील नसून केवळ विषयांचे चाप्टर्स होते, असा दावा करत आहे. शिवाय 'हे चाप्टर्स येऊ शकतील' असा सूचक संदेशही 'त्या' मेसेजमध्ये असून प्रश्नपत्रिकेतील ते प्रश्न नव्हते, असा बचाव विद्यापीठाने केला आहे. पेपरफुटीला कोणताही वाव नसल्याचे आणि संपूर्ण गोपनियता बाळगली जात असल्याचा पुनरुच्चार कुलगरुंनी केला.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..