Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Tuesday, December 2, 2014

Nagpur RTO Online Application Website Stop, Not Opening, Working

Nagpur RTO Online Application Website Stop, Not Opening, Working


Nagpur RTO Online website For permanent License is not working , not opening Many peoples not taken online appointment. Now Nagpur RTO has made compulsory
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), शहर सोबतच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातही (पूर्व) परमनंट लायसन्ससाठी (पक्का वाहन परवाना) सोमवारपासून 'ऑनलाईन अपॉईंटमेंट'ची सक्ती करण्यात आली आहे. मात्र आज एकाही उमेदवाराने 'अपॉईंटमेंट' घेतली नसल्याने दिवसभर या विभागाचे काम ठप्प होते.
आरटीओ, शहर व ग्रामीण कार्यालयात १ सप्टेंबरपासून तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्वमध्ये १७ सप्टेंबरपासून शिकाऊ परवान्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे उमेदवाराला आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवडणे शक्य झाले आहे. या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता १ डिसेंबरपासून पक्क्या वाहन परवान्यासाठी ऑनलाईन भेटीची वेळ देण्याची पद्धत लागू करण्यात आली. परंतु याची जनजागृती झाली नसल्याने आज जे उमेदवार आरटीओमध्ये उपस्थित होते ते विना अपॉईंट आले होते. या सर्वांना खाली हात परतावे लागले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी जे उमेदवार खाली हात परतले यातील अनेकांनी मंगळवारसाठी अपॉईंटमेंट घेतले आहे. सायंकाळपर्यंत आरटीओ, शहरमध्ये पाच जणांनी तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ३0 उमेदवारांनी अपॉईंटमेंट घेतले आहे.


No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..