Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, December 29, 2014

Shipai Bharti Aurangabad 78 Posts Written Exam Answer Key, Result, Selection List

Shipai Bharti 2014 Aurangabad 78 Posts Written Exam Answer Key, Result, Selection List

रोजगाराचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, याचा प्रत्यय रविवारी येथील भूमी अभिलेख खात्याच्या शिपाई पदाच्या भरती परीक्षेत आला. शिपाई पदाच्या ७८ जागांसाठी तब्बल साडेअकरा हजार उमेदवार आले होते. त्यात पदवीधरांचा भरणा अधिक होता.
विशेष म्हणजे त्यासाठी चौथी पासची किमान पात्रता असताना पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी मिळविणारे उमेदवारच मोठय़ा संख्येने होते. भूमी अभिलेख खात्यातील मराठवाडा विभागामधील लघुलेखक, भूकरमापक, लिपिक टंकलेखक आणि शिपायांच्या रिक्त पदांसाठी रविवारी लेखी परीक्षा झाली. सकाळच्या सत्रात लघुलेखक आणि भूकरमापक पदांसाठी, दुपारच्या सत्रात शिपाई पदासाठी शहरातील ३५ केंद्रांवर परीक्षा झाली. शासकीय नोकरीकडे तरूणांचा अजूनही कल असल्याचे या परीक्षेसाठी एवढय़ा मोठय़ा संख्येने आलेल्या उमेदवारांमुळे लक्षात येऊ शकते. दुपारच्या सत्रात शिपायांच्या ७८ पदांसाठी झालेल्या पदांसाठी तब्बल १३,७७५ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यात मराठवाड्यातील आठही जिल्हे तसेच यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, धुळे आदी जिल्ह्यांमधील उमेदवारांचाही समावेश होता. 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..