Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Thursday, December 12, 2013

MPSC geological (भूवैज्ञानिक) Recruitment Written Exam Result, Answer Key 2013 Recheck

MPSC geological (भूवैज्ञानिक) Recruitment Written Exam Result 2013 Recheck


MPSC geological (भूवैज्ञानिक) Recruitment Written Exam Result 2013 Recheck

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या सहायक व कनिष्ठ भूवैज्ञानिक भरतीमध्ये प्रचंड घोळ झाला असून जाहीर केलेला निकाल मागे घेण्याची नामुष्की पहिल्यांदाच एमपीएससीवर आली आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयांतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयांकरिता सहायक भूवैज्ञानिक गट ब आणि कनिष्ठ भूवैज्ञानिक गट ब या पदांसाठी १४ जुलै २0१३ रोजी मुंबईला एमपीएससीमार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली. एमपीएससीचे सहसचिव संजय गद्रे यांच्या आदेशान्वये परीक्षार्थ्यांना हॉल तिकीट जारी करण्यात आले होते. उमेदवाराला लेखी परीक्षेत मिळालेले गुण (२00 गुणांपैकी) व मुलाखतीत मिळालेले गुण (५0 गुणांपैकी) एकत्र ग्राह्य धरून अंतिम गुणवत्ता यादी लावली जाईल, असे या हॉल तिकीटवर स्पष्टपणे नमूद आहे.
लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षार्थ्यांना गुण तपासता यावे म्हणून 'आन्सर-की' जारी करण्यात आली. त्यानंतर यातील पात्र परीक्षार्थ्यांची मौखिक परीक्षा नागपूर, औरंगाबाद व पुणे येथे २ ते ६ सप्टेंबर २0१३ दरम्यान घेण्यात आली. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी औरंगाबाद, विदर्भातील उमेदवारांसाठी नागपूर तर कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी पुणे येथे मुलाखती ठेवल्या गेल्या. परंतु प्रत्यक्षात मराठवाड्यातील उमेदवारांना नागपुरात तर विदर्भातील उमेदवारांना मुलाखतीसाठी औरंगाबाद येथे बोलविण्यात आले. त्यात विशेषत: भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमध्ये सध्या कनिष्ठ भूवैज्ञानिक पदावर कार्यरत कर्मचार्‍यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या मुलाखती घेण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाचे अतिरिक्त संचालक एस.बी. खंडाळे नागपुरात, उपसंचालक शहा पुण्यात तर सहसंचालक चेतन गजभिये औरंगाबाद येथे हजर होते. या मुलाखतींमध्ये प्रचंड घोळ करण्यात आला. आपल्या खात्याच्या कनिष्ठ भूवैज्ञानिकांसाठी 'सॉफ्ट कॉर्नर' ठेवला गेला. मुलाखतीअंती सहायक भूवैज्ञानिक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची शिफारस यादी २६ नोव्हेंबर रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर केली. मात्र या निवड यादीमध्ये घोळ असल्याचे उमेदवारांच्या निदर्शनास आले. लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षेचे गुण एकत्र करून अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल, असे आयोगाच्या जाहिरात आणि हॉल तिकीटवर स्पष्ट असताना केवळ मुलाखतीचे गुण ग्राह्य धरून ही यादी लावली गेली. त्यासाठी मोठी 'उलाढाल' झाल्याचे बोलले जाते. हा घोळ निदर्शनास आल्यानंतर उमेदवारांनी 'उमेदवार निवडीचे निकष काय', अशी विचारणा एमपीएससीकडे केली असता केवळ मुलाखतीच्या निकषावर निवड यादी जाहीर झाल्याचे सांगण्यात आले. हा घोळ लक्षात येताच एमपीएससीने २६ नोव्हेंबरला सकाळी आपल्या संकेतस्थळावर टाकलेली निवड यादी सायंकाळी अचानक हटविली. विशेष असे, एमपीएससीचा कुठलाही अधिकारी आता या मुद्यावर बोलण्यास तयार नाही. अनेकांनी आपले फोन बंद करून ठेवले आहेत. यादी जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये ४0 टक्के सदस्य हे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या कार्यालयांचेच असल्याचे सांगण्यात येते.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..