Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Thursday, October 17, 2013

MAHATET Dec 2013 Syllabus Download, Paper Pattern

MAHATET Dec 2013 Syllabus Download, Paper Pattern


Following is the details Syllabus of MAHATET Dec 2013



पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर)

१) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा सामावेश राहील.

या विषयासाठी अध्यापत शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत विहित सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.

२) भाषा-१ व भाषा-२

या परिक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा १ व भाषा-२ विषय घेता येतील.


भाषा-१ मराठी इंग्रजी उर्दू
भाषा-२ इंग्रजी मराठीमराठी किंवा इंग्रजी


इ. १ ली ते ५ वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील.

३) गणित:-

गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

गणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.

४ परीसर अभ्यास :-

परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरीक शास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असतील. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. १ ली व इ. २री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास. नागरीक शास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता १ ली ते ५ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक शालांत परिक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ:-

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठक्रम

प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

संबंधित विषयांची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इ. १ ली ते १० वी ची पाठ्यपुस्तके

पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)

पाठ्यक्रमाची (Syllabus) व्याप्ती :-

१) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र:-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील.

या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.

(२)भाषा-१ तसेच (३)भाषा-२

या परिक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१व भाषा-२ विषय घेता येतील.

भाषा-१ मराठी इंग्रजी उर्दू
भाषा-२ इंग्रजी मराठीमराठी किंवा इंग्रजी


इ. ६ वी ते ८ वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठक्रम लागू राहील.

४अ) गणित व विज्ञान विषय गट-

गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय गटातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठक्रम लागू राहील.

४ब) सामाजिक शास्त्रे विषय गट-

सामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पन, आशय व अध्यापन शास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.

प्रचिलत प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६वी ते ८वी च्या अभ्यासक्रमावर मधील संबंधिक विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परिक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ:-

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी व पाठ्यक्रम

प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठक्रम

प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इ. १ ली वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके

प्रचलित बी.एड्. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम          

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..