Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Sunday, April 13, 2014

Nagpur University Summer 2014 Examination Postpone

Nagpur University Summer 2014 Examination Postpone Timetable Change, New Timetable

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना तब्बल एक महिना उशीर होत आहे. विद्यापीठाने तिसर्‍या व चौथ्या टप्प्यातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात बी. एसस्सी प्रथम व व्दितीय सेमिस्टरच्या परीक्षा ३ मे पासून सुरू होणार आहेत. शिवाय एम. ए. व्दितीय सेमिस्टरच्या परीक्षा २४ मे पासून सुरू होईल. अशाप्रकारे इतर सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुमारे एक महिना उशिरा सुरू होणार आहे. माहिती सूत्रानुसार लोकसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात फेरबदल करावा लागला. त्यामुळे वेळापत्रक जाहीर करण्यास विलंब झाला आहे. निवडणुकीच्या घोषणेपूर्वी विद्यापीठाने दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु इतर अनेक परीक्षा विद्यापीठाला स्थगित कराव्या लागल्या होत्या. जाणकारांच्या मते, वेळापत्रकातील या फेरबदलाचा थेट विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्रावर परिणाम होणार आहे. दरवर्षी विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र जून महिन्यात सुरू होते. परंतु यंदा परीक्षांना विलंब झाल्यामुळे शैक्षणिक सत्र पुढे ढकलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परीक्षा विभागातील अधिकार्‍यांच्या मते, सर्व परीक्षांना लागणारा वेळ लक्षात घेता, दोन पेपरमधील कलावधी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..