Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Sunday, April 27, 2014

Maharashtra State New Syllabus of 3rd & 4th Standard

Maharashtra State New Syllabus of 3rd & 4th Standard 


Maharashtra State News Syllabus Details For Class 3rd & Class 4th From 2014 | Syllabus & New Books Details 4th Standard , 3rd Standard.



महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाद्वारे आगामी शैक्षणिक सत्राकरिता तिसरी व चौथीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. यासाठी राज्यातील गटशिक्षणाधिकार्‍यांना दोन टप्प्यात पुणेयेथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मे व जूनमध्ये जिल्ह्यातील विशेषत: तालुक्यातील सर्व शाळांमधील संबंधित शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी मार्गदर्शन करतील.
महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने नवीन शैक्षणिक वर्षापासून इयत्ता तिसरी व चौथीचा अभ्यासक्रम बदलविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची राज्यात युद्धस्तरावर अंमलबजावणी शिक्षण विभाग करीत आहे. जून महिन्यात सुरू होणार्‍या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावीत व अभ्यासाचा श्रीगणेशा याच दिवशी व्हावा, याकरिता शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.
अभ्यासक्रमाची पुस्तके मिळाल्यानंतर त्याच वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी राज्यातील गटशिक्षणाधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्याला २ मे पासून सुरूवात होईल. 
त्यानंतर आठदिवस गटशिक्षणाधिकार्‍यांना प्रशिक्षण मिळणार आहे. यात नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक या विभागांचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्याला ७ मे पासून सुरूवात होईल. ११ मे पर्यंत चालणार्‍या या प्रशिक्षणात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोणते मार्गदर्शन करावे, याविषयी गटशिक्षणाधिकार्‍यांना विषयतज्ज्ञ पुण्यात धडे देणार आहेत. या टप्प्यात मुंबई, अमरावती, कोल्हापूर, नांदेड या विभागातील गटशिक्षणाधिकार्‍यांचा सहभाग राहणार आहे. शिक्षकांना मिळणार विशेष मार्गदर्शन 
■ पुढील सत्रात इयत्ता तिसरी, चौथी व संभाव्य पाचवीचा अभ्यासक्रम बदलविण्याकरिता शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विशेषत: पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. पुणे येथील प्रशिक्षण झाल्यानंतर धामणगाव तालुक्यातील ८२ शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. मोफत पाठय़पुस्तक योजनेंतर्गत पुस्तक प्राप्त होताच पुढील शैक्षणिक सत्रापासून इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम त्याच दिवसापासून सुरू करण्यात येणार आहे.


No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..