Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Wednesday, April 16, 2014

पाकिस्तानी मीडियात मोदींचीच चर्चा

 पाकिस्तानी मीडियात मोदींचीच चर्चा | Effect of Narendra Modi in Pakistan Media in Marathi


पाकिस्तानी मीडिया तर मोदींच्या नावावर तुटून पडलेला दिसतो. त्यातही प्रिन्ट मीडिया पुढेच आहे. केवळ उर्दूच नव्हे तर सिंधी आणि पंजाबी वृत्तपत्रेही हिंदुस्थानमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या बातम्यांचे रकानेच्या रकाने भरभरून लिहीत आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेज हिंदुस्थानात अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यावर चादर अर्पण करण्यासाठी आले असता, ते दिल्लीलाही गेले. दिल्लीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घ्यायची आणि त्यांच्याकडून गुजरात राज्यातील कच्छच्या रणामधील सी क्रीक हा भूभाग पदरात पाडून घ्यायचा, अशी त्यांची योजना होती. फाळणी झाली तेव्हा कच्छच्या रणातील दहा टक्के भाग पाकिस्तानात गेला होता. उर्वरित ९० टक्के भाग हिंदुस्थानात आहे. तो गोड गोड बोलून आणि अतिशय गोपनीयतेने मिळवायचा अशी त्यांची योजना होती. पंतप्रधानांना भेटल्यानंतर त्यावर गुप्ततेनेच शिक्कामोर्तब होणार होते. पाकिस्तान आणि बांगलादेशच्या निर्मितीपासून एकतर ते बळजबरीने हिंदुस्थानचा भूभाग बळकावतात किंवा गुपचूप गोड गोड बोलून मिळवतात. राजा परवेज यांच्या या योजनेची कशी कोण जाणे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना खबर लागली. तेही तत्काळ दिल्लीला गेले. त्यांनी मनमोहन सिंग यांना इशारा दिला की, खबरदार, हिंदुस्थानचा काही भूभाग पाकिस्तानला सोपवाल तर! मोदींच्या दिल्लीत पोहोचल्याच्या खबरीने राजा परवेज यांच्या योजनेवर पाणी फेरले गेले. राजा परवेज यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. सी क्रीक हाती न लागल्याने पाकिस्तानी नेत्यांची मोठीच निराशा झाली. त्यामुळे आज जेव्हा मोदींची हिंदुस्थानात प्रचंड लोकप्रियता निर्माण झालेली आहे, आणि निवडणुका जिंकण्याच्या सीमारेषेवर आज मोदी आणि भाजपा आहे, हे पाकिस्तानच्या पचनी पडत नाहीये.
भाजपने यापूर्वीही निवडणुका लढवलेल्या आहेत आणि अटलबिहारी वाजपेयींसारखा दूरदर्शी आणि राष्ट्रभक्त व्यक्ती पंतप्रधानपदीही बसवलेला आहे. पण आज मोदींचे नाव पुढे येऊ लागल्याने पाकिस्तानी नेत्यांच्या मनात घबराट निर्माण झाली. हिंदुस्थानच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात पाकिस्तानी वृत्तपत्रांत यंदा अतिशय मोठ्या प्रमाणात बातम्या, विश्‍लेषणे वगैरे छापून येत आहेत. पाकचा भाजपला नेहमीच विरोध होता, पण आजच्या इतका त्यांनी इतिहासात कधीही विरोध केला नाही. इंदिरा गांधींच्या नावाची पाकिस्तानच्या मनात भीती बसलेली होती, तशीच आज मोदींच्या नावाची आहे. पाकिस्तानी मीडिया तर मोदींच्या नावावर तुटून पडलेला दिसतो. त्यातही प्रिन्ट मीडिया पुढेच आहे. केवळ उर्दूच नव्हे तर सिंधी आणि पंजाबी वृत्तपत्रेही हिंदुस्थानमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या बातम्यांचे रकानेच्या रकाने भरभरून लिहीत आहेत. या बातम्यावरून व्यक्त होणारी भूमिका पाहता एक गोष्ट तर स्पष्टच होते की, पाकिस्तानला भविष्यातील सर्वात मोठे आव्हान मोदींचेच वाटते. पाकच्या गोड गोड बोलण्याला ते भुलणारे नाहीत. २००२ च्या दंगलींनी आणि मुसलमानांच्या आरडाओरड्याने ना ते घाबरले ना विरघळले, असे पाकिस्तानच्या लक्षात आलेले आहे. आठ दिवसांपूर्वीच पाकिस्तानी दैनिक ‘डॉन’ने बातमी छापली आहे की, मोदी हे पूर्ण बहुमत मिळवतील आणि सत्ता स्थापन करतील. दैनिक ‘एक्सप्रेस उर्दू’ लिहितो की, यंदाच्या निवडणुकीत सर्वात स्पष्टपणे भूमिका मांडणारा नेता केवळ नरेंद्र मोदीच आहेत. मोदी हे आपला पाच वर्षांचा कार्यकाळ निश्‍चितच पूर्ण करतील. त्यांच्या अलायन्समधील विविध पक्ष मनापासून त्यांना पाठिंबा देतील. दै. डॉनने म्हटले आहे की, नरेंद्र मोदींच्या नावामुळे मुस्लिम संभ्रमात आहेत. पण त्यातही मोदींच्या बाजूने बोलणारेही आहेत, असेही चित्र दिसून येते. भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात समान नागरी कायदा आणि राममंदिराचे निर्माण हेही मुद्दे आहेत. तरीही त्याच्या विरोधात कुणी बोलताना दिसून येत नाही.
पाकिस्तानी वृत्तपत्रे म्हणतात की, यंदा भाजप सत्तेसाठी काही तडजोड करेल असे वाटत नाही. पूर्वी जनसंघ जनता पक्षात विलीन झाला होता तसे आता काही वाटत नाही. अनेक राज्यांमध्ये राज्यस्तरीय पक्षांनी भाजपशी यशस्वी जागावाटप केलेले आहे. हिंदुस्थानी राजकारण परिपक्व झालेले आहे. पाक वृत्तपत्रे असेही म्हणतात की, खरे तर कोणत्याही अस्थिर देशात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्‍चन कुणीही सुखी समाधानी राहू शकत नाही. पाकिस्तानी पत्रकारांना पाकिस्तानपेक्षा हिंदुस्थानची अधिक काळजी का वाटू लागली आहे? पाकिस्तानमधील विद्यमान परिस्थितीला पाकिस्तानी सरकारच जबाबदार आहे. पाकिस्तानमधील जनतेच्या हलाखीला पाक सरकारच जबाबदार आहे. पाक वृत्तपत्रे लिहितात की, हिंदुस्थानी नेते अर्थसंकल्पाचा वापर करून जनतेचा जीवनस्तर सुधारावा यासाठी प्रयत्न करीत असतात. दर पाच वर्षाने जनतेत जावे लागेल याचे त्यांना भान असते. पाकिस्तानात मात्र नेते मार्शल लॉची भाषा बोलतात, जनताही गुलामीला तयार असते. हेच आम्हा पाकिस्तानवासीयांचे सर्वात मोठे दुर्दैव आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्रे हिंदुस्थानमधील मुस्लिमांच्या परिपक्वतेबाबतही बरेच काही लिहितात. ती म्हणतात, हिंदुस्थानी मुस्लिम डोळे झाकून मतदान करतात अशी आता स्थिती राहिलेली नाही. सोनिया गांधी शाही इमामांपुढे आत्मसमर्पण करतात तेव्हा त्याचा काही मोजक्या मुस्लिम नेत्यांना फायदा होतो खरा, पण बाकी मुस्लिम समाज कायम अंधारात राहतो. यात कॉंग्रेसपेक्षा मुस्लिम नेत्यांचाच अधिक दोष आहे. हिंदुस्थानी मुस्लिमांनी आपले मतदान धर्माच्या चौकटीत कैद करून ठेवलेले आहे. त्याला सरकार किंवा राजकीय पक्ष तरी काय करतील? याच शाही इमामांमुळे आणीबाणीत मुस्लिमांना किती सहन करावे लागले होते? धर्माच्या नावावर मुस्लिम आणखी किती काळ ब्लॅकमेल होत राहतील हे कळत नाही. 

1 comment:

Anonymous said...

This Site is very essential for me. Because I have got many information from here.Thank You ..........
Employment News in India

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..