Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Thursday, January 29, 2015

Microsoft Data centers 20000 Job Vacancy Recruitments

Microsoft Data centers 20000 Job Vacancy Recruitments


Microsoft Data Centres in Maharashtra are opening very Soon. Because of this there will be huge scope of Job Vacancy in Maharashtra IT Sector. Maharashtra's New CM Devendra Fadnavis Declared today about this. Details are given below in Marathi Language.

 जगविख्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज येथे भेट घेऊन मुंबई आणि पुणे येथे डाटा सेंटर्स उभारणार असल्याचे सांगितले. त्यासाठी कंपनी २,१00 कोटी रुपये खर्च करणार असून, ती आशिया खंडातील सर्वात मोठी डाटा सेंटर्स असतील.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, की स्वित्झर्लंडमधील दाव्होसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत आपली कॉग्निझंटचे प्रमुख गॉर्डन कोबर्न यांच्याशी चर्चा झाली. ही कंपनी पुण्याजवळील प्रकल्पाचा विस्तार करून २0 हजार नवे रोजगार निर्माण करणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या मदतीने लवकरच डिजिटल ओळखपत्न तयार करण्याची योजना सुरू करणार असून, आधार कार्डच्या माहितीचा आधार घेऊन अन्य सर्व विविध ओळखपत्नांना एकत्नित करून हे डिजिटल ओळखपत्न तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जीई इलेक्ट्रिक कंपनी ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. प्रामुख्याने डॉएच बँक, जेपी मॉर्गन, नोमुरा फायनान्शियल सव्हिर्सेस, स्विस अँग्रिकल्चर फायनान्सिंग या कंपन्यांनी मुंबईमध्ये गुंतवणुकीसाठी तत्परता दर्शविली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  व्हॅल्यू चेनची योजना राज्यातील ऊस वगळता १४ प्रमुख पिकांचे उत्पादन ते मार्केटिंगपर्यंतच्या प्रक्रियेसाठी बड्या कंपन्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. पुढील वर्षापर्यंत २५ लाख शेतकरी या व्हॅल्यू चेन योजनेत जोडले जातील. तसेच जलयुक्त शिवार योजनेत ऑस्ट्रेलियाने सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. शिनिची कोईझुमी आणि जपानी बहुराष्ट्रीय कंपनीस नागपूर येथे जागतिक दर्जाचे एकात्मिक वस्त्रोद्योग पार्क उभारणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

1 comment:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..