Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Thursday, January 29, 2015

Mumbai RTO Learning Licence Details, Time For Ladies Women's

Mumbai RTO Learning Licence Details, Time For Ladies (Women's) Online Appointment details


एसटी आणि शेअर टॅक्सीत महिला प्रवाशांना पुढची सीट देण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतला असतानाच आता आरटीओत लर्निंग लायसन्ससाठी (शिकाऊ) महिलांना स्वतंत्र वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचे आदेशही परिवहन विभागाला देण्यात आले आहेत. दुपारी २ ते सायंकाळी ४ ही वेळ महिलांसाठी निश्‍चित करण्यात आली आहे. ज्या महिलांना ही वेळ अनुकूल वाटते त्या महिला या वेळेत लर्निंग लायसन्साठी आरटीओत जाऊ शकतात, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.
प्रवासात महिला प्रवाशांशी लगट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे एसटी किंवा शेअर टॅक्सीतून प्रवास करताना महिला प्रवाशांना असुरक्षित वाटते. हे पाहता एसटी किंवा शेअर टॅक्सीत महिला प्रवाशांना पुढची सीट आरक्षित ठेवण्याचा निर्णय परिवहन मंत्री रावते यांनी घेतला. यामुळे महिला प्रवाशांचा सुरक्षित प्रवास हा त्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले होते. याबरोबरच राज्यातील आरटीओतही लर्निंग लायसन्सची ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी येणार्‍या महिलांना स्वतंत्र वेळ देण्याचा निर्णय रावते यांनी घेतला आहे. लर्निंग लायसन्स मिळविण्यासाठी ऑनलाइन परीक्षा आरटीओत द्यावी लागते. ही परीक्षा देण्यासाठी प्रथम वेळ घ्यावी लागते आणि वेळ मिळाल्यानंतर आरटीओत गेल्यावर लांबच लांब रांगांना सामोरे जावे लागते. लर्निंग लायसन्सची ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी येणार्‍यांमध्ये महिला प्रवाशांचा मोठय़ा प्रमाणात समावेश असतो. पुरुषांबरोबर एकाच रांगेतून महिलांनाही परीक्षेसाठी जावे लागत असल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचप्रमाणे काही महिलांना तर कामे सोडून दिलेल्या वेळेनुसार आरटीओत यावे लागते. त्यामुळे महिलांना दुपारी २ ते सायंकाळी ४ ही वेळ निश्‍चित करण्यात आली असून स्वतंत्र रांगही असेल.

ऑनलाइन यंत्रणेत होणार बदल
मात्र अशी वेळ निश्‍चित करण्यासाठी त्याआधी आरटीओच्या लर्निंन लायसन्सच्या ऑनलाइन यंत्रणेतही बदल करावा लागेल. लर्निंग लायसन्साठी येण्याअगोदर आरटीओकडून ऑनलाइनमधील नियोजित भेट (अपॉइन्टमेन्ट) घ्यावी लागते. यामध्येच बदल करावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले. 

1 comment:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..