Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, August 29, 2014

RTMNU PhD Entrance Exam PET 2014 Details

RTMNU PhD Entrance Exam PET 2014 Details

Nagpur University PET 2014

Nagpur University PET 2014 Exam Details, Important Dates & Schedule Details are given below. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे घेण्यात येणार्‍या 'पेट'संदर्भात (पीएच.डी. एन्ट्रन्स टेस्ट) उमेदवारांकडून मोठय़ा प्रमाणात विचारणा करण्यात येत होती. अखेर विद्यापीठाने 'पेट'ची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून होणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु आश्‍चर्याची बाब म्हणजे तंत्रज्ञानासंदर्भात मोठमोठे दावे करणार्‍या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर याची माहितीच उपलब्ध नाही. याशिवाय 'एमकेसीएल'तर्फे संचालित करण्यात येणार्‍या 'पेट'चे संकेतस्थळ 'अपडेट' करण्यात आलेले नाही. यामुळे 'ऑनलाईन' परीक्षेची माहिती 'ऑनलाईन'च उपलब्ध नसल्याचा विरोधाभास दिसून येत आहे.
नागपूर विद्यापीठात 'ऑनलाईन' 'पेट' वर्षातून एकदा घेण्यात येते. दरवर्षी 'एमकेसीएल'च्या माध्यमातून या परीक्षेची प्रक्रिया राबविण्यात येते. परंतु विद्यापीठ प्रशासन व 'एमकेसीएल' यांच्यात देयकांच्या मुद्यावरील बर्‍याच काळापासून धुमसत असलेला वाद शिगेला पोहोचला अन् 'एमकेसीएल'ने विद्यापीठाचे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे 'पेट'चे काय होणार, असा प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित करण्यात येत होता.
अखेरीस 'पेट'च्या प्रक्रियेच्या तारखा विद्यापीठाकडून घोषित करण्यात आल्या आहेत. ५ सप्टेंबरपासून 'ऑनलाईन' आवेदन करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आवेदन करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. या 'ऑनलाईन' परीक्षेचे आयोजन इंग्रजी व मराठी भाषेत करण्यात येणार आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या सूचनेत 'एमकेसीएल'तर्फे संचालित 'पेट'च्या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु संबंधित 'ओअँसिस.एमकेसीएल.ओआरजी.एनयूपीईटी' या संकेतस्थळावर अद्यापही २0१३ या वर्षातील परीक्षेची माहिती उपलब्ध आहे. याशिवाय विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. अशा स्थितीत उमेदवारांपर्यंत या परीक्षेची माहिती नेमकी पोहोचणार कशी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..