Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, August 25, 2014

IT Return online filing in Marathi | कसे भरावे आयटी रिटर्न ?

IT Return online filing in Marathi |  कसे भरावे आयटी रिटर्न ?


आयटी रिटर्न म्हणजे उत्पन्नावर लागणारे कर होय. या कराचा भरणा केल्यास संबंधितांचे व्यवहार चोख असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे त्यांना आवश्यकतेनुसार बँकांकडून कर्ज उपलब्ध करण्यास मदत होते. आयटी रिटर्न भरल्याने शासनाच्या तिजोरीत पैसा जमा होतो तो पैसा शासन समाजाच्या विकासावर खर्च करते. त्यामुळे विविध विकास कामे मार्गी लागतात. याचा फायदा समाजाला होतो. समाजात कुणी श्रीमंत तर कुणी गरीब राहतात. गरिबांना सोई मूलभूत उपलब्ध होण्याच्या उद्देशाने शासन विविध योजना राबविते. त्यातून लाभार्थ्यांचा विकास व्हावा, हा शासनाचे उद्देश असतो. मग ह्या योजना राबविण्यासाठी लागणारे भांडवल कोठून मिळवणार तर ठरावीक नागरिकांकडून, मादक पदार्थ विक्री करणार्‍यांकडून तसेच ठरावीक उत्पन्नावर कर किती भरावे याची सीमा शासनाने आखून दिली आहे. त्यानुसार बहुतांश नागरिक कराचा भरणा करतो. त्या पैशातून विविध योजना राबविल्या जातात आवश्यक कागदपत्रे
■ शासकीय नोकरीत असल्यास १६ नंबरचे फॉर्म भरून सीएंच्या माध्यमातून शुल्क भरून रिटर्न भरले जाते. ही प्रक्रिया आता ऑनलाईन झाल्याने त्वरित रिटर्नचा भरणा होण्यास मदत होते. ऑनलाईन प्रक्रिया
■ रिटर्न भरण्याची प्रक्रिया पूर्वी किचकट स्वरुपाची होती. त्यामुळे बहुतांश नागरिक रटिर्न भरण्याचे टाळत होते परंतु आता ऑनलाईन झाल्यामुळे ५00 रुपये शुल्क भरून अध्र्या तासांत रिटर्न भरल्याने प्रिंट हातोहात मिळते. 
 रिटर्न भरण्याचे फायदे
■ उत्पन्नावर आधारित रिटर्न भरण्याचे शुल्क आकारले जातात. आपल्या उत्पन्नावर आकारण्यात आलेल्या कराचा योग्य वेळेत भरणा केल्यास आपली समाजात पत राहते. सरकारला उभारी मिळते. विकास कामांची गती वाढते. त्यामुळे देशाच्या प्रगतीत आपला खारीचा वाटा असल्याचे सिद्ध होते. शिवाय आपल्याला मोठय़ा रकमेची गरज भासल्यास योग्य वेळी बँकांकडून कर्ज उपलब्ध करणे सोईचे होते. आदी फायदे रिटर्न भरल्याचे आहेत. अशी आहे प्रक्रिया
■ रिटर्न भरण्याची प्रक्रिया पूर्वी किचकट स्वरुपाची होती. त्यामुळे बहुतांश नागरिक रिटर्न भरण्याच्या भानगडीत पडत नव्हते. मात्र आता ही प्रक्रिया ऑनलाईन तर झालीच; तथापि बहुतांश नागरिकांना समजण्यासाठीदेखील सोईची झाली आहे. रिटर्न भरण्याची आवश्यकता असो वा नसो प्रत्येक नागरिक आपल्यावरील बोझा कमी करण्याच्या अनुषंगाने रिटर्न भरून मोकळा होतो. कारण त्याचे फायदेही अनेक आहेत. समाजात प्रतिष्ठा, गरजेच्या वेळी कर्ज उपलब्ध करणे सोपे जाते. त्यामुळे रिटर्नची अडचण येऊ नये यासाठी आधीच दरवर्षी रिटर्न भरून व्यवहार चोख ठेवण्याच्या उद्देशाने बहुतांश नागरकि रिटर्न भरत आहेत.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..