Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Saturday, August 9, 2014

Engineering Admission DTE CAP 2014 Admission Empty Seats

Engineering Admission DTE CAP 2014 Admission Empty Seats


तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेचा जवळपास अखेरचा टप्पा सुरू आहे. याअगोदर प्रवेशप्रक्रियेत 'कॅप'च्या (सेंट्रलाईज्ड अँडमिशन प्रोसेस) महत्त्वाच्या तीन फेर्‍या आटोपल्या असून नागपूर विभागातील महाविद्यालयांत चक्क ६१ टक्के जागा रिक्त आहेत. यात 'कॅप'सोबतच संस्थापातळीवरील तसेच अल्पसंख्यांक संस्थांमधील जागांचादेखील समावेश आहे. संपूर्ण विभागात केवळ १0 हजार जागांवरच प्रवेश झाले आहेत. एकूणच एकीकडे 'बेसिक सायन्स'कडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असताना अभियांत्रिकीकडे मात्र पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढल्यामुळे यंदा प्रवेश चांगल्या प्रमाणात होतील ही महाविद्यालयांची अपेक्षा 'कॅप'च्या (सेंट्रलाईज अँडमिशन प्रोसेस) तिसर्‍या फेरीअखेर पूर्णत: फोल ठरली आहे. विभागातील ५७ महाविद्यालयांमध्ये २६,0८0 जागा आहेत. यापैकी २१,८५९ जागांवर 'कॅप'नुसार प्रवेश झाले. यासाठी यंदा केवळ १७,१९६ म्हणजेच सुमारे ७0 टक्के अर्ज दाखल झाले होते. समुपदेशन फेरीअखेर ९,७९१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. इतर कोट्यातून झालेल्या प्रवेशाची आकडेवारी लक्षात घेता एकूण २६,0८0 जागांपैकी केवळ ३८.३५ टक्के जागांवर प्रवेश झाले आहेत. १६,0७८ म्हणजेच ६१.६५ टक्के जागा रिक्त आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे शासकीय महाविद्यालये, अभिमत संस्था येथील रिक्त जागांवर प्रवेशासाठी अतिरिक्त फेरी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ व ८ जून विद्यार्थ्यांनी यासाठी 'ऑनलाईन' अर्ज दाखल करावयाचे होते व ९ तारखेला तात्पुरती प्रवेशयादी घोषित होणार आहे. परंतु खासगी महाविद्यालयांसमोर मात्र मोठे संकट आहे.
बोटांवर मोजण्याइतपत प्रवेश
पहिल्या फेरीत नागपूर विभागातील केवळ साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. दुसर्‍या फेरीअखेर ३५ टक्के प्रवेश झाले होते व आता अखेरच्या फेरीनंतर केवळ ३८.३५ टक्के प्रवेश झाले आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे तसेच बाहेरील अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्राधान्य दिले किंवा 'बेसिक सायन्स'च्या अभ्यासक्रमांत प्रवेश घेतला. विभागात अभियांत्रिकीची एकूण ५७ महाविद्यालये आहेत. एका ठिकाणी तर एकही प्रवेश झालेला नाही तर अर्धा डझन महाविद्यालयांत बोटांवर मोजण्याइतपत प्रवेश झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..