Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :


Monday, July 14, 2014

VidyaVahini By Mumbai University 2014

VidyaVahini By Mumbai University 2014

VidyaVahini Mumbai Universityग्रामीण आणि आदिवासी पाड्यांमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी तसेच सामाजिक आणि आर्थिक बदलाची अचूक माहिती स्थानिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठाने 'विद्यावाहिनी' हा उपक्रम हाती घेतला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत विद्यावाहिनी या व्हॅनचे उद््घाटन करण्यात येणार असून, जव्हार, वाडा, मोखाडा, तलासरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या भागात तंत्रज्ञानाच्या जोडीने माहितीचे स्रोत घराघरांत पोहोचविण्यात येणार आहेत.
उच्च शिक्षणामध्ये होणारे बदल तसेच सामाजिक गरजा आणि सामाजिक बदलांच्या स्थित्यंतराच्या दिशेने वाटचाल करीत मुंबई विद्यापीठाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांकडे असणारे अपुरे शैक्षणिक साहित्य तसेच तंत्रज्ञानाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये अडथळे येतात. हे अडथळे सोडविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना सामाजिक आर्थिक बदलाची माहिती मिळावी यासाठी विद्यावाहिनी या व्हॅनद्वारे तंत्रज्ञानाच्या जोडीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम
  • बुक शेअरिंग
  • प्रश्नमंजूषा
  • पुस्तक देणगी
  • पुस्तक चाचणी स्पर्धा
  • पुस्तक अनुवाद स्पर्धा
विद्यावाहिनीमध्ये पाच संगणक, एलसीडी प्रोजेक्टर, १६0 इंचीचा प्लाजमा स्क्रीन, बाह्य मोटोराईज्ड स्क्रीन, वाय-फाय कनेक्टीव्हिटी, जीपीएस प्रणाली, पूर्ण वातानुकूलित, व्हॅनमध्ये मुलांना बसण्यासाठी बाके, हजारो मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पुस्तके, सामाजिक, आर्थिक आणि व्यक्तिमत्त्व विकासावरील पुस्तके, सामाजिक प्रश्नांचे लघुपट, डिजिटल इनसायक्लोपिडीया ऑफ ब्रिटानिका,बेस्टसेलर ऑडिओ बुक्स, जे-स्टोर आणि एब्स्को यामधील ई-र्जनल्स, प्रकल्प इत्यादी अत्याधुनिक सुविधा व्हॅनमध्ये असणार आहेत.  

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..