Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :


Wednesday, July 23, 2014

rtmnu.digitaluniversity.ac is Closed By MKCL ?

rtmnu.digitaluniversity.ac is Closed By MKCL ?

rtmnu.digitaluniversity.ac Closed


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि 'एमकेसीएल' यांच्यातील वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. विद्यापीठाचे 'डिजिटल' संकेतस्थळ उघडण्याचा प्रयत्न केला असता सातत्याने 'आऊट ऑफ सर्व्हिस'चा संदेश लिहून येत आहे. 'एमकेसीएल'ने काढता पाय घेतला असला तरी विद्यापीठाने तत्काळ पर्यायी व्यवस्थेची हालचाल न केल्याने संकेतस्थळ 'डेड' झाले आहे.
विद्यापीठाची दोन संकेतस्थळे अस्तित्वात आहेत. यातील 'आरटीएमएनयू. डिजिटलयुनिव्हर्सिटी' (rtmnu.digitaluniversity.ac) या संकेतस्थळाचे सर्व काम 'एमकेसीएल'कडे होते. सुरुवातीला सर्वकाही योग्य राहिल्यानंतर विद्यापीठ व 'एमकेसीएल' (MKCL) मध्ये खटके उडायला लागले. 'एमकेसीएल'ने कामांची पूर्तता केली नसल्याचा आरोप विद्यापीठाकडून करण्यात आला अन् सुमारे ३ कोटी ६४ लाखांची देयके थकवून ठेवली. 
'एमकेसीएल'ने वाढीव बिले दिल्याचादेखील दावा विद्यापीठ प्रशासनाने केला होता. 'एमकेसीएल' ने थकबाकीसाठी जवळपास २५0 वेळा विद्यापीठाला पत्र लिहिले. अखेर 'एमकेसीएल'ने विद्यापीठाचे काम थांबविण्याचा निर्णय घेतला. 
याचा फटका सर्वात पहिले बसला तो विद्यापीठाच्या 'आरटीएमएनयू.डिजिटलयुनिव्हर्सिटी' या संकेतस्थळाला. हे संकेतस्थळ तात्पुरते 'आऊट ऑफ सर्व्हिस' असल्याचा संदेश येत आहे. विद्यार्थी व महाविद्यालयांनी अधिक माहितीसाठी विद्यापीठाशी थेट संपर्क साधावा, अशा ओळीदेखील 'फ्लॅश' होत आहेत.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..