Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, April 4, 2014

Practical Examination Summer 2014 RTM Nagpur University

Practical Examination Summer 2014 RTM Nagpur University | New practical Exam dates 2014 RTMNU 

Practical Examination Summer 2014 of RTM nagpur university will be counducted after Election. New dates of Practical Examination will be declared Soon. For all updates & news about RTMNU News keep visiting www.resultshub.net. 
निवडणुकांमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. परंतु अनेक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षांबाबत संभ्रम कायम होता. अनेक ठिकाणी परीक्षकच निवडणूक कामात लागल्याने परीक्षा विभागाने प्रात्यक्षिक परीक्षा या निवडणुकानंतरच घेण्याचे निर्देश जारी केले आहेत. महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षांच्या नवीन तारखा ठरवाव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे.
अनेक महाविद्यालयांनी नियोजित वेळापत्रकानुसार प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली होती. परंतु काही ठिकाणी अंतर्गत किंवा बहिर्गत परीक्षकांच्या नियुक्त्या निवडणूक कामाकरिता झाल्यामुळे नेमके काय करावे यासंदर्भात परीक्षा विभागाकडे विचारणा होत होती. अखेर गुरुवारी परीक्षा विभागाने सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना एक पत्र लिहून प्रात्यक्षिक परीक्षा निवडणुकानंतर आयोजित करण्याबाबत कळविले आहे. पुढील आठवड्यात विदर्भात मतदानाचा टप्पा आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केल्या असतील व परीक्षक निवडणूक कामात व्यस्त असतील तर परीक्षा समोर ढकलण्यात याव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय महाविद्यालयांनी नवीन वेळापत्रक तयार करून याची माहिती विद्यार्थ्यांसोबतच विद्यापीठाला कळवावी, असे सांगितले आहे. 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..