Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, April 18, 2014

Fire Engineering Collage in Nagpur, Maharashtra Admission Details, Course Details

Fire Engineering Collage in Nagpur, Admission Details, Course Details


Admission in Fire Engineering College was expected to start in March - April 2014 year BE Fire Engineering This claim was done by claim that the National Fire Services College ( NSSC ) but as per the current status its Not Expected. Construction of the building started college but still slow speed access is likely to be take this year for Completion. Fire officials of the college was not informed  terms.
College is located in Raj nagar Nagpur area of ​​26 acres of space allocated for this building. There is still many areas of the construction. As well as the new syllabus has not been created yet . However, no official person want to speak on this matter. Fire Engineering College University RTM for approval of new courses is also under Process & Pending.
Fire Engineering College nine years before the above course starts. The Old course was of 3.5 Yers . The new course is four years Course. BSc curriculum that old to get access to it . as per new course Students can then access the new curriculum, on the 12th basis. The proposed curriculum, Civil , Mechanical required will include a variety of engineering . The consultant has been involved in of course.
Increasing the number of college new posts has been set . BE Fire Engineering has proposed to 84 new posts . 116 posts are required to be fully operational .

नवनिर्मित फायर इंजिनियरिंग कॉलेजमध्ये मार्च-एप्रिल २0१४ या वर्षात बी.ई. इन फायर इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश सुरू होईल, असा दावा नॅशनल फायर सर्व्हिसेस कॉलेज (एनएसएससी)तर्फे करण्यात आला होता. परंतु कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम अजूनही धिम्या गतीने सुरू असल्याने यंदा प्रवेश होण्याची शक्यता नाहीच. यासंबंधात फायर कॉलेजच्या अधिकार्‍यांनी यापूर्वीसुद्धा नाव न छापण्याचा अटीवर माहिती दिली होती. परंतु आता ते काही बोलायलाच तयार नाहीत.
राजनगर परिसरात २६ एकर जागेवर फायर कॉलेजचे बांधकाम सुरू आहे. अजूनही अनेक विभागांचे बांधकाम शिल्लक आहे. काही झोपड्याही अजून हटवायच्या आहेत. तसेच नवीन अभ्यासक्रमसुद्धा अद्याप तयार झालेला नाही. अधिकारी मात्र यासंबंधात काहीच बोलायला तयार नाहीत. फायर इंजिनियरिंग कॉलेजचा नवीन अभ्यासक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात मंजुरीसाठी गेला आहे. परंतु त्याला मंजुरी मिळायची आहे.
फायर इंजिनियरिंग कॉलेजमध्ये नऊ वर्षांपूर्वीपर्यंत उपरोक्त अभ्यासक्रम सुरू होते. जुना अभ्यासक्रम केवळ साडेतीन वर्षांचा होता. तर नवीन अभ्यासक्रम चार वर्षांचा आहे. जुन्या अभ्यासक्रमात बीएससी करणार्‍या विद्यार्थ्यांनाच यात प्रवेश मिळत असे. नवीन अभ्यासक्रमात मात्र १२ वी नंतर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. प्रस्तावित अभ्यासक्रमात सिव्हील, मॅकेनिकल, स्ट्रक्चरलसह इंजिनिअरिंगच्या विविध विभागांतील आवश्यक बाबींचाही समावेश करण्यात येईल. अभ्यासक्रमात नेदरलॅण्ड येथील सल्लागाराच्या शिफारशीनाही सहभागी करण्यात आले आहे.
नवीन कॉलेजच्या बांधकामासोबतच पदांची संख्या वाढविण्याचा प्रस्तावसुद्धा ठेवण्यात आला आहे. बी.ई. फायर इंजिनिअरिंगसाठी गृहमंत्रालयाकडून ८४ नवीन पदांची मागणी केली आहे. पूर्णपणे संचालनासाठी ११६ पदांची आवश्यकता आहे. 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..