Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, April 7, 2014

78 Lack Students deprived From Maharashtra Scholarship 2014

78 Lack Students deprived From Maharashtra Scholarship 2014 

■ बुलडाणा जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या अर्जदार विद्यार्थ्यांची संख्या १४७३८ होती. त्यातील केवय ६१२९ च्या पदरी शिष्यवृत्ती पडली. गोंदियात अर्जदार ८0२९ होते, शिष्यवृत्ती मिळाली, ११३५ जणांना.
■ मुंबई उपनगरात १३ हजार विद्यार्थ्यांपैकी ४६0१ विद्यार्थ्यांनाच लाभ मिळाला.
■ पुणे जिल्ह्यात याच प्रवर्गात ३६९२0 विद्यार्थ्यांपैकी १४२१७ विद्यार्थी वंचित राहिले. मुंबई : सामाजिक न्याय विभागातर्फे सन २0१३-१४ मध्ये अर्ज केलेल्यांपैकी तब्बल ७८ लाख ८२२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच मिळू शकली नाही. १७ लाख ४५ हजार ४४९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. त्यातील ९ लाख ५९ हजार ६0७ विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्तीची रक्कम मिळू शकली. ७८ लाख ८२२ विद्यार्थी वंचित राहिले.
सामाजिक न्याय विभागाकडूनच ही धक्कादायक आकडेवारी मिळाली आहे. ११ वी, १२ वी, पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम आदींच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागातर्फे दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते.
तथापि, यावेळी ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात अर्जदार विद्यार्थ्यांपैकी ५५ टक्के विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळाली. ४५ टक्के विद्यार्थी वंचित राहिले.
अर्जदार विद्यार्थी आणि शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या (कंसात) अशी - अनुसूचित जाती ५३७१९७ (३९७६६९), इतर मागास प्रवर्ग ८0२३२९ (३९२२९४), विशेष मागास प्रवर्ग ६९५७३ (२६६८९), विमुक्त जाती/भटक्या जमाती ३३६३५0 (१४२९५५). याचा अर्थ अनुसूचित जातीच्या ७४ टक्के विद्यार्थ्यांना, इतर मागास वर्गात ४९ टक्के, विशेष मागास प्रवर्गात ३८ टक्के तर विमुक्त जाती/भटक्या जमातींमधील ४३ टक्के विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळाली आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती दिली जाते. आधीच्या वर्षांमधील प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यात बरेचदा निधी खर्च होतो.
यंदा प्रलंबित राहिलेली शिष्यवृत्ती पुढील वर्षी दिली जाते. ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. कोणीही वंचित राहू नये, असा प्रयत्न असतो.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..