Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Saturday, August 31, 2013

SSC scholarship maharashtra Website Not Working Or Opening

SSC scholarship maharashtra Website Not Working Or Opening दहावीनंतर अभ्यासक्रम असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याकरिता ऑन लाईन अर्ज करण्याची प्रक्रिया मागील दीड महिन्यापासून सुरू आहे. या दीड महिन्यात शिष्यवृत्तीचे इंटरनेटवरील संकेतस्थळ अनेकवेळा बंदच राहीले. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करता आले नाही.
शिष्यवृत्तीकरिता ११ वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर आदी व्यवसायिक अभ्यासक्रमात असणार्‍या विद्यार्थ्यांना शासनाकडून शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थी प्रवेश अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्राच्या जुळवाजुळवीसाठी पैसे खर्च करतात. त्यानंतर नजिकच्या संगणक केंद्रावर जावून शिष्यवृत्तीसाठी ऑन लाईन अर्ज करावा लागतो. मागील दीड महिन्यांपासून प्रवेश अर्ज करण्याला प्रारंभ झाला आहे. परंतु शिष्यवृत्तीसाठी असलेले इंटरनेटवरील संकेतस्थळ दिवसभर सुरू होत नव्हते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. चुकून सुरू झाल्यास ते हळूवार चालत असल्याने ऑनलाईन अर्ज स्वीकारले गेले नाहीत. त्यामुळे हजारो विद्यार्थी संकटात सापडले आहेत.
शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख ३0 ऑगस्ट होती. परंतु काही व्यवसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया शासनाने अद्यापही सुरू केली नाही. यातच आज ३0 ऑगस्ट ही शिष्यवृत्ती भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास आपण शिष्यवृत्तीपासून वंचित राहू, या भितीने विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिष्यवृत्ती करीता अर्ज करण्याची अंतिम तारीख जाऊनही इंटरनेट संकेतस्थळात सुधारणा झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू नसल्याने शिष्यवृत्तीची अंतिम तारीख वाढविण्याची मागणी केली जात आहे.

As Per the Notification By mahaeschol.maharashtra.gov.in - शैक्षणिक वर्ष २०१३-२०१४ साठीचे अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०१३ आहे.

Important Links : 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..