Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :


Sunday, July 20, 2014

CIDCO Kharghar Scheme Application Forms, Dates, Draw Results

CIDCO Kharghar Scheme 2014 Application Forms, Dates, Draw Results


CIDCO Kharghar Scheme 2014
 The Corporation develops residential complexes to meet the housing needs of various categories of economic standing. As of today, CIDCO has developed over one lakh twenty five thousand housing units for various income categories within Navi Numbai such as EWS/LIG, MIG and HIG categories and the housing developed by CIDCO always commands a very high response in the market. These housing schemes are promoted through advertisements. 

सिडकोच्या माध्यमातून खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पातील घरांसाठी जाहीर केलेली अर्ज विक्रीची तारीख लांबणीवर पडली आहे. त्यामुळे २२ जुलैऐवजी आता १ ऑगस्टपासून अर्जविक्री सुरू करण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याचे समजते. खारघर सेक्टर ३६ येथील व्हॅलीशिल्प गृहप्रकल्पाच्या शेजारी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी सिडकोने मेगा गृहप्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांसाठी ७0४ तर अल्प उत्पन्न गटासाठी २५९0 अशी एकूण ३२९४ घरे आहेत. यातील घरांच्या किमती १६ ते २४ लाखांच्या घरात असणार आहेत. साधारण मार्च २0१६ पर्यंत या गृहप्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या प्रकल्पातील घरांसाठी २२ जुलैपासून अर्जविक्री सुरू करण्यात येणार असल्याचे सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी दोन आठवड्यापूर्वी जाहीर केले होते. मात्र प्रशासकीय स्तरावर याबाबतची तयारी अद्याप पूर्ण न झाल्याने अर्ज विक्रीची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. या प्रकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी २८.५५ चौरस मीटरच्या एकूण ७0४ सदनिका आहेत. त्यांची किमत १५ लाख ७८,३00 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा दर प्रति चौरस फूट ५१३६ रूपये इतका आहे. तर अल्प उत्पन्न गटाच्या एकूण २५९0 सदनिका आहेत. या गटातील सदनिकाचे एकूण क्षेत्रफळ ३४.३६ चौ.मी. इतके आहे.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..