Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :


Tuesday, July 22, 2014

Amravati 11th Admission Selection List, Waiting List

Amravati 11th Admission Selection List, Waiting List  • ■ २१ ते २३ जुलैदरम्यान सर्वसाधारण यादीनुसार प्रवेश निश्‍चित होणार
  • ■ २१ जुलै रोजी तक्रार निवारण दिवस
  • ■ २५ व २६ जुलै रोजी मॅनेजमेंट कोटा प्रवेश 
  • ■ २८ जुलै संपूर्ण प्रवेश यादी जाहीर
  • ■ २८ जुलैपासून महाविद्यालयात शैक्षणिक अभ्याक्रमाला सुरुवात सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला आहे. प्रवेश प्रक्रियेबाबतची आकडेवारी शनिवारी व सोमवारी निश्‍चित होईल.

अकरावी प्रवेश प्रक्रियेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली. शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळाली. पहिल्या दिवशीच जवळपास ५0 टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाल्याचे कळते. मागील यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव पसंतीक्रमानुसार आले नाही, अशा पालकांच्या तक्रारी केंद्रीय प्रवेश स्िमतीकडे करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील शेवटची यादी शनिवारी जाहीर होताच सकाळपासुन शहरातील विविध महाविद्यालयामध्ये अकरावी प्रवेशाकरीता विद्यार्थ्यांची धावपळ सुरु झाली होती. ९ हजार ३५५ प्रवेश क्षमतापैकी ५ हजार ९६२ विद्यार्थ्यांपैकी ५0 टक्के विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील प्रवेश २८ जुलैपर्यंत सुरु राहणार असून अन्य विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित होणार आहे. 

यावर्षी अकरावी प्रवेशाकरिता केंद्रीय समितीकडे कला शाखेत २८८५ क्षमतेपैकी ८९२, वाणिज्य शाखेत १४७५ पैकी ११८६ व विज्ञान शाखेत ४९९५ पैकी ४८६४ प्रवेश क्षमता निश्‍चित झाली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा अधिक कल वाणिज्य व विज्ञान शाखेकडे दिसून आला आहे. 
सद्यस्थितीत वाणिज्य शाखेत ३0 टक्के जागा शिल्लक असून विज्ञान शाखेत केवळ ३ टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे विज्ञान शाखेत प्रवेशासाठी इच्छुक असणार्‍या काही विद्यार्थ्यांंना विज्ञान शाखेच्या प्रवेशापासुन वंचित राहण्याची वेळयेणार आहे. यावर तोडगा काढण्याचे संकेत केंद्रिय सामितीने दिले असुन २८ जुलै नंतरच सर्व बाबी स्पष्ट केली जाईल असे केंद्रिय समितीकडुन सांगण्यात येत आहे.

1 comment:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..