Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :


Friday, February 21, 2014

Pragat Din Mahotsav of Gajanan Maharaj From 22 Feb 2014

Pragat Din Mahotsav of Gajanan Maharaj From 22 Feb 2014


Pragat Din Mahotsav of Gajanan Maharaj From 22 Feb 2014

संतनगरी शेगावात माघ वद्य ७ म्हणजेच शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी श्रींचा १३६ वा प्रगटदिनोत्सव साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी संत नगरी सज्ज झाली असून, संस्थान व श्रींच्या समाधी-मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
संत नगरीत भजन दिंडी दाखल होत असून, गुरूवारपर्यंत २६0 भजनी दिंडी संत नगरीत दाखल झाल्या आहेत. या दिंडींना भजनी साहित्य दुरूस्तीकरिता अंशदान देण्याचे येत आहे. नवीन भजनी दिंडींना संस्थानच्या नियमाची पूर्तता केल्यानंतर भजनी साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. संत नगरीत दाखल झालेल्या भजनी दिंडींना महाप्रसाद त्याचप्रमाणे विणेकर्‍यांना श्रीफळ दुप्पटा, महिलांना ब्लाऊज पिस देऊन यथोचित सत्कार संस्थानच्यावतीने करण्यात येत आहे.
मंदिर परिसरातील संभाव्य गर्दी लक्षात घेता संस्थानकडे जाणारा मार्ग एकेरी करण्यात आलेला आहे. यामध्ये दर्शनबारी व मुख्य दर्शनबारी, महाप्रसाद, श्रींचा पारायण मंडप, पलंग व औदुंबर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे; तसेच भक्तांची पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था भुस्कुटीच्या मळ्यात केली आहे. श्री गजानन भक्त मंडळ टिमकी नागपूर यांनीसुद्धा संस्थानच्या बाजूलाच श्री गजानन चित्र मंदिरसमोर जोडे-चपला ठेवण्याची विनामूल्य व्यवस्था केलेली आहे.
गजानन भक्त मंडळ आकोट, नागपूर व स्थानिक भक्तांनीसुद्धा योग्य ठिकाणी वारकर्‍यांना, भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. शासनाने पार्कींग व्यवस्थेचा प्रश्न सोडवलेला नसल्याने भक्तांना पार्कींग समस्यांना नाहक सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे चित्र शहरात आहे.

1 comment:

Teresa Halminton said...

I look forward to hearing more updates from you.
outlook.com

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..