Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Wednesday, December 2, 2015

Nagpur University Summer 2016 Exam From 5 March 2016

Nagpur University Summer 2016 Exam From 5 March 2016, Timetable of Summer 2016 


RTM Nagpur University Summer 2016 Examination will be expected to carried from the 5th March 2016. As per the Official Notification declared by RTMNU ( nagpur University) the Summer 2016 Examination are expected to begin from 5th March 2016 in 7 Phases which includes BA, BCom, BSC, BCA, BBA, MBA, MCA, BEd, MEd & All other courses. The Timetable of Summer 2016 Examination will be published soon on resultshub.net Soon. More details are given in following news. 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना ५ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गोंधळ टाळण्यासाठी यंदा परीक्षा सात टप्प्यांत घेण्यात येणार आहे. यासंदर्भात परीक्षा विभागातर्फे संभाव्य तारखांची घोषणा करण्यात आली आहे. हिवाळी परीक्षांमध्ये 'ऑनलाईन' प्रणालीला अनेक महाविद्यालयांनी हवे तसे सहकार्य केले नाही. त्यामुळे उन्हाळी परीक्षांत त्यावरुन गोंधळ होऊ नये यासाठी यंदा अगोदरच या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरील संभाव्य वेळापत्रक घोषित झाले होते.
हिवाळी परीक्षांपासून विद्यापीठाकडून 'ऑनलाईन' परीक्षा प्रणाली सुरू करण्यात आली. परंतु अनेक महाविद्यालयांनी 'ऑनलाईन' परीक्षा अर्ज भरलेच नाही. त्यामुळे ऐन वेळेवर प्रवेशपत्रांसाठी विद्यार्थ्यांची धावपळ उडाली आणि विद्यार्थ्यांसोबत परीक्षा विभागातील कर्मचार्‍यांनादेखील मन:स्ताप सहन करावा लागला. त्यामुळे उन्हाळी परीक्षांसंदर्भात परीक्षा विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. याकरिताच ८२९ परीक्षांसाठीचे संभाव्य वेळापत्रक यंदा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच घोषित करण्यात आले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रात्यक्षिक परीक्षांची तारीख नंतर घोषित करण्यात येईल असेदेखील विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी) सात टप्प्यात होणार परीक्षा
विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सात टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ७६ प्रमाणपत्र तसेच पदविका अभ्यासक्रमांची परीक्षा घेण्यात येईल. यात निरनिराळ्या विदेशी भाषा व पदव्युत्तर पदविकांचा समावेश असेल. दुसरा टप्पा १५ मार्चपासून सुरू होईल व यात कला, वाणिज्य, विज्ञानशाखेच्या प्रथम तसेच अंतिम वर्षातील पदवी परीक्षा घेण्यात येतील. उन्हाळी परीक्षांच्या तिसर्‍या टप्प्यास १0 एप्रिल रोजी सुरुवात होईल व यात कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षांचा प्रामुख्याने समावेश असेल. २५ एप्रिलपासून सुरू होणार्‍या चौथ्या टप्प्यात अभियांत्रिकी व तांत्रिक विषयांच्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येतील. तर ४ मे रोजी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पहिल्या व तिसर्‍या सत्राच्या परीक्षांना सुरुवात होईल. १0 मेपासून अभियांत्रिकीच्या ४, ६ व ८व्या सत्राच्या परीक्षा सुरू होतील. तर १७ मे पासून सुरू होणार्‍या अखेरच्या टप्प्यात एमटेक, एमए, एमएस्सी इत्यादी अभ्यासक्रमाच्या २ व ४ व्या सत्राच्या परीक्षा घेण्यात येतील. 

5 comments:

Street view said...

i received many useful information from your post. Thank you for sharing!!
* google maps street view
* email sign up

stickmannnnn said...

I regularly visit your site and find a lot of interesting information.
Not only good posts but also great comments.
Thank you and look forward to your page growing stronger.
stickman

bloxorz said...

I found a lot of interesting information here. A really good post, very thankful and hopeful that you will write many more posts like this one.

happy wheels said...

I believe there are many other people who are interested in them just like me! How long does it take to complete this article? I hope you continue to have such quality articles to share with everyone! I believe a lot of people will be surprised to read this article! Thanks for your post!

street view said...

I totally understand what you are writing about and I appreciate it.

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..