Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, June 15, 2015

SSC Fail 2015 Re Exam Application Forms

SSC Fail 2015 Re Exam Application Forms


Maharashtra SSC Fail 2015 Candidates can apply for the Reexamination before the Last Date 23 June 2015. The Examination will be held in July - August 2015. More Details are given below. 

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी नापास विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेसाठी सोमवारपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे वर्ष वाया जाण्याची भीती असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार आहे.
मार्च २0१५ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेस ५ हजार ३५ विद्यार्थी अनुपस्थित राहिले होते. त्याचप्रमाणे १ लाख ३४ हजार ३४६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांना जुलैमध्ये परीक्षा देऊन ऑगस्टमध्ये महाविद्यालयात प्रवेश घेण्याची चांगली संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, २३ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. याचदरम्यान विद्यार्थ्यांना शुल्कही भरता येईल. 
२४ ते २७ जूनदरम्यान विलंब शुल्क भरता येईल. शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल.


दिवसा काम करणारे बहुतांश विद्यार्थी रात्र शाळा किंवा १७ क्रमांकाचा अर्ज भरून दहावी देतात. 
अशा प्रकारे रात्र शाळेतून परीक्षेला सामोरे गेलेल्या ४ हजार ७७६ विद्यार्थ्यांपैकी १ हजार २५७ विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होता आले नव्हते, तर १७ क्रमांकाचा अर्ज भरलेल्या ५९ हजार ३५५ विद्यार्थ्यांपैकी ५१.१८ टक्के विद्यार्थी नापास झाले होते. 
त्यामुळे या सर्वच विद्यार्थ्यांना सोमवारी अर्ज करून कमी पडलेल्या कष्टाची चीज करण्याची संधी आहे.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..