Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :


Monday, June 30, 2014

MHADA Mumbai Lottery Refund Process

MHADA Mumbai Lottery Refund Deposit Amount Process


म्हाडाची यंदाची घराची सोडत होऊन ५ दिवसांचा अवधी उलटूनही अद्याप 'रिफंड'बाबत काहीच हालचाल करण्यात आलेली नाही. रक्कम त्यांच्या खात्यावर कधी जमा होणार, याबाबत वेबसाइट किंवा अर्जदारांच्या ई-मेल, मोबाइलवर काहीही माहिती देण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे सुमारे ९२ हजारांवर अयशस्वी अर्जदारांमध्ये चिंता लागून राहिली आहे. हक्काची रक्कम कधी मिळणार, याच्या प्रतीक्षेत असून त्याबाबत गेल्या वर्षीप्रमाणे मनस्ताप देऊ नये, अशी इच्छा त्यांच्यातून व्यक्त होत आहे. त्यांचे सुमारे तब्बल २२७ कोटीे १९ लाख रुपये परत करावयाचे आहेत. विजेत्यांचे ६ कोटी ८0 लाख म्हाडाकडे राहणार आहेत.
म्हाडाने मुंबई व विरार-बोळीज आणि वेंगुर्ल्यामध्ये बांधलेल्या २६४१ सदनिकांची गेल्या बुधवारी संगणकीय सोडत काढण्यात आली. त्यातील विजेत्यांना आनंद गगनात मावेना झाला आहे. मात्र, अयशस्वी ठरलेल्यांमध्ये नाराजी असून फॉर्मसोबत भरलेली रक्कम त्वरित मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लॉटरीसाठी इच्छुक असलेल्या ९३ हजार १३0 जणांकडून सुमारे २३४ कोटींवर अनामत रक्कम मिळाली आहे. त्यापैकी विजेत्या ठरलेल्यांची रक्कम जवळपास ६ कोटी ८0 लाख ८२,५00 आहे. ती वगळता २२७ कोटी १९ लाख १७,५00 रुपये संबंधित अर्जदारांच्या बॅँक खात्यांवर परत करावयाचे आहेत. हा व्यवहार अँक्सिस बॅँकेमार्फत करण्यात आला असून २६ जूनला सोडतीनंतर बॅँकेला विजेत्यांची नावे कळविण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त उर्वरित अर्जदारांनी त्यांनी फार्ममध्ये नमूद केलेल्या बॅँक खात्यावर रक्कम जमा करावयाची सूचना केली असली तरी त्यासाठी कालर्मयादा निश्‍चित केलेली नाही.
गेल्या वर्षी झालेल्या सोडतीमध्ये 'रिफंड'बाबत अधिकार्‍यांच्या सावळ्या गोंधळामुळे व तांत्रिक चुकीमुळे ५0 हजारांवर अर्जदारांना मनस्ताप सहन करावा लागला होता. काहीही चूक नसताना त्यांना विलंबाने रक्कम मिळाली. काही जणांच्या खात्यावर दोन-दोन वेळा रक्कम जमा करण्याचा 'प्रताप' अँक्सिस बॅँकेकडून झाला होता. त्यातून जवळपास १७ लाख रुपये म्हाडाला परत मिळाले नाहीत. मात्र, स्वत:ची चूक असल्याने म्हाडाने 'तेरी भी चूप मेरी भी चूप' असे तत्त्व बाळगून हा खर्च सोसला.
मंडळाकडून गेल्या वर्षी ३१ मे रोजी झालेल्या सोडतीमधील अयशस्वी अर्जदारांचे डिपॉझिट परत करण्यामध्ये म्हाडा व अँक्सिस बॅँकेने मोठा घोळ केला होता, त्यामुळे नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळण्यास महिना, दीड महिन्याचा अवधी लागला. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने या वेळी विशेष खबरदारी घेतली असली तरी रक्कम त्यांच्या बॅँक खात्यामध्ये जमा करण्याबाबत ठोस कालावधी जाहीर केलेला नाही. 
Source : Local News Paper 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..