Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, June 2, 2014

Maharashtra B.Ed., M.Ed. CET 2014 14 June 2014

Maharashtra B.Ed., M.Ed. CET 2014 14 June 2014



२0१३-१४ या सत्राकरता बी.एड. (बॅचलर ऑफ एज्युकेशन) व एम.एड. (मास्टर्स ऑफ एज्युकेशन)अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी अनिवार्य असलेल्या शासनाच्या सामायिक प्रवेश प्रक्रियेच्या आवेदनाची प्रक्रिया २२ मे पासून सुरू झाली आहे. संपूर्णपणे संगणकीकृत असलेल्या या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहेत. १४ जून रोजी होणार्‍या सीईटीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून ही आहे.
राज्यातील विद्यापीठांमधील शासकीय अनुदानित, विनाअनुदानित तसेच अशासकीय कायम विनाअनुदानित 'बी.एड.' व 'एम.एड.' अभ्यासक्रमासाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी सीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. उच्च शिक्षण संचालनालयातर्फे संचालित करण्यात येणार्‍या या प्रवेशप्रक्रियेची संपूर्ण प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. 'एमकेसीएल'च्या संकेतस्थळावर याची माहिती उपलब्ध आहे.एम.एड.साठी इच्छुक असणार्‍या उमेदवारांनी सर्व अध्यापक महाविद्यालयांसाठी, माध्यमासाठी, कोट्यासाठी एकच प्रवेश अर्ज भरावा असेदेखील सांगण्यात आले आहे. ३0 जून रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल व त्यानंतर प्रवेश फेर्‍या सुरू होतील अशी माहिती उच्चशिक्षण संचालनालयातर्फे देण्यात आली आहे. 
बी.एड.चे प्रवेश ४ तर 'एम.एड.'चे प्रवेश ३ फेर्‍यांमधून होतील. अखेरची फेरी ही महाविद्यालय स्तरावर प्रतिक्षा यादीची असेल. यात रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश घेण्याची संधी असेल.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..