Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, June 23, 2014

DTE Engineering Admission Process 2014 Detail steps - dtemaharashtra.gov.in

DTE Engineering Admission Process 2014 Detail steps

DTE Engineering Admission Process 2014

Engineering Admission process is starting from 23 June 2014. Following are the details Admission Walk-through, Important Dates, Tips For Admission & Documents details , Everything required for the DTE Engineering Admission 2014 Details are given below in Simple Marathi Language. 

बहुप्रतीक्षित इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अखेर २३ जूनपासून सुरू होत आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) शुक्रवारी कागदपत्र पडताळणी, ऑनलाइन अर्ज भरणे आणि तो कन्फर्म करणे या प्रवेशाच्या प्राथमिक टप्प्याची माहिती अधिसूचनेद्वारे जारी केली आहे.

प्रवेशाचा पहिला टप्पा Engineering Admission First Step :

* स्वायत्त इंजिनीअरिंग कॉलेजेस, राज्य सरकारी किंवा अनुदानित इंजिनीअरिंग कॉलेजेस, युनिव्हर्सिटी मॅनेज्ड इन्स्टिट्यूट्स, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स, आयसीटी, मुंबई आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत (कॅप) सहमतीने सहभागी होत असलेली खासगी इंजिनीअरिंग कॉलेजेस आदी संस्थांमधील प्रवेशांसाठी शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मधील प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पार पाडण्यात येणार आहे.

* प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे, तो अर्ज स्वीकृती केंद्रांवर (एआरसी) जाऊन कन्फर्म करणे आणि कागदपत्र पडताळणी करणे या प्रक्रियांचा समावेश आहे.

प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी Eligibility For Engineering Admission 2014 


* विद्यार्थी भारतीय नागरिक असावा आणि त्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (एचएससी बोर्ड) किंवा समकक्ष बारावीची परीक्षा दिलेली असावी.

* फिजिक्स, गणित आणि केमिस्ट्री/बायोटेक्नॉलॉजी/बायोलॉजी/टेक्निकल व्होकेशनल (टेक्निकल व्होकेशनल विषयांची यादी 'डीटीई'च्या वेबसाइटवर आहे. त्यात आयटी विषयाचा (कोड ९७) समावेश आहे.) विषयांत ५० टक्के किंवा त्याहून अधिक (राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ४५ टक्के किंवा त्याहून अधिक) गुण मिळवलेले असावेत.

* महाराष्ट्रातील (८५ टक्के जागा) विद्यार्थ्यांचा 'पॉझिटिव्ह कम्पोझिट स्कोअर' असावा. (या स्कोअरबाबतचा तपशील नंतर स्वतंत्रपणे जाहीर होणार आहे.)

अर्जप्रक्रियेचे स्वरूप How To Get an Application Form of Engineering Admission 2014


* विद्यार्थ्यांनी जवळच्या अर्ज स्वीकृती केंद्रावरून (एआरसी) रोख ७०० रुपयांना (राखवी गटातील विद्यार्थ्यांसाठी ५०० रुपये) अॅप्लिकेशन किट खरेदी करावे.

* विद्यार्थ्यांनी 'अॅप्लिकेशन किट'च्या मदतीने www.dtemaharashtra.gov.in/fe2014 या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. त्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून तो 'एआरसी'वर स्वतः जाऊन (प्रतिनिधी चालणार नाही) निश्चित करायचा आहे. या वेळी आवश्यक कागदपत्रेही (मूळ आणि साक्षांकित) सादर करायची आहेत.

* पोस्टाने पाठवलेले अर्ज रद्दबातल ठरविण्यात येतील.

महत्त्वाच्या सूचना / Important Instructions


* अॅप्लिकेशन किटमध्ये अॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड असेल. त्याचबरोबर प्रवेश फेऱ्यांच्या (कॅप) पायऱ्या आणि त्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे यांचीही त्यात माहिती असेल. अॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्डच्या आधारे ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.

* ऑनलाइन अर्ज सबमिट करणे आणि नंतर तो 'एआरसी'वर स्वतः जाऊन कन्फर्म करणे आवश्यक आहे.

* महाराष्ट्रातील जे विद्यार्थी महाराष्ट्रासाठीच्या जागांबरोबरच अखिल भारतीय कोट्यातील प्रवेशासाठी इच्छुक असतील, त्यांनी एकच ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. अशा विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार दोन्हीपैकी उपलब्ध सर्वोत्तम जागा दिली जाईल.

* भारताबाहेर बारावी किंवा समकक्ष परीक्षा देऊन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पात्रतेबाबत आधी राज्यातील विद्यापीठांकडून पडताळणी करून घ्यावी.

* ऑनलाइन अर्ज भरून, तो 'एआरसी'वर कागदपत्र पडताळणीसह कन्फर्म करून घेतलेले आणि त्यानंतर गुणवत्ता क्रमांक (मेरिट नंबर) मिळालेले विद्यार्थीच 'कॅप'साठी पात्र ठरतील, याची नोंद घ्यावी.

* सर्व 'एआरसी' रविवार आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू राहतील.

* विद्यार्थ्यांना २८ जून ते ३ जुलै या काळात 'एआरसी'वर माहिती पुस्तिका विनामूल्य मिळेल.

* 'एआरसी'ची यादी www.dtemaharashtra.gov.in/fe2014 या वेबसाइटवर आहे.

* हेल्पलाइन क्रमांक Help Line Number : ०२२-३०२३३४४४/४५/४६

वेळापत्रक Schedule & Important Dates 


  • * 'एआरसी'वर 'अॅप्लिकेशन किट'ची विक्री : २३ जून ते २ जुलै 
  • * www.dtemaharashtra.gov.in/fe2014 या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज भरणे : २३ जून ते ३ जुलै 
  • * 'एआरसी'वर विद्यार्थ्याने समक्ष जाऊन कागदपत्र पडताळणी आणि ऑनलाइन अर्ज कन्फर्म करणे : २३ जून ते ३ जुलै (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) 
  • * तात्पुरती गुणवत्ता यादी : ५ जुलै सायंकाळी ५ वाजता 
  • * तात्पुरत्या यादीवर आक्षेप : ६ ते ८ जुलै (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) 
  • * अंतिम गुणवत्ता यादी : ९ जुलै सायंकाळी ५ वाजता

    विद्यापीठाकडून सर्वात अगोदर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणे अपेक्षित असते. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने लावलेल्या ५0 टक्के शिक्षक भरतीच्या अटीमुळे नुकतेच बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अक्षरश: हैराण झाले आहेत. महाविद्यालयांनी आर्थिक नुकसान नको म्हणून विनाअनुदानित तुकड्यांच्या जागांवर प्रवेश देणे थांबविले असून त्यामुळे ८0 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयांत प्रवेशासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. प्रवेशासाठी महाविद्यालयांत गेल्यावर त्यांना नकारघंटा मिळत आहे. त्यामुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांकडून 'कुणी प्रवेश देता का प्रवेश' असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..