Nagpur University Winter 2014 Timetable | RTM Nagpur University Today's Summer 2014 New Result | BE 5th Semester Summer 2014 Result RTMNU | B.Sc. Part 2 Summer 2014 Result RTMNU | Nagpur University BE 6th Semester Summer 2014 Result | BE 4th Semester Summer 2014 Result RTMNU | DTE Poly Admission 2014 CAP Round 2 Allotment

Search Any Result / Job :

Thursday, January 2, 2014

Sukanya Yojna Maharashtra Details 2014

Sukanya Yojna Maharashtra Details 2014

घरातील स्त्री साक्षर झाली तर सर्व कुटुंब साक्षर होते. यासाठी समाजातील प्रत्येक स्त्रीला शिक्षण देणे गरजेचे आहे. राज्यातील मुलांइतकाच मुलींचा जन्मदर वाढावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्यात जानेवारी २0१४ पासून सर्व गटातील दारिद्रय़ रेषेखाली जन्मलेल्या प्रत्येक मुलींसाठी सुकन्या योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेत मुलींच्या मोफत शिक्षण, आरोग्य सुविधा व भविष्य निर्वाह निधीचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील वाढत्या मुलींच्या शिक्षण व आरोग्याबाबत सुधारणा करणे, त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रूणहत्या, मुलीच्या जन्माबाबत समाजात सकारात्मक बदल करणे, बालविवाह व मुलाइतकाच मुलींचा जन्मदर वाढविणे हे सदर योजनेचे उद्दीष्ट आहे.
या योजनेचा शुभारंभ राज्यात जानेवारी २0१४ पासून केला जाणार आहे. सर्व दारिद्रय़ रेषेखाली जन्मलेल्या प्रत्येक मुलीसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.
या योजनेत मुलीचा जन्म झाल्यानंतर तिची जन्मनोंद एक वर्षाच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थेत करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या नावे जन्मत: २१ हजार २00 रुपये, मुलीच्या जन्माच्या एक वर्ष आत विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून या मुलीस १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर १ लाख इतकी रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.
विमा कंपनी व केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजनेंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रकमेतून २१ हजार २00 रुपयांतून १00 रुपये प्रतीवर्षी इतका हप्ता जमा करून सदर मुलीच्या कमवित्या पालकाच्या नावे विमा उतरविला जाणार आहे. यात पाल्याचा नैसर्गिक अपघाती मृत्यू झाल्यास ३0 हजार रुपये, अपंगत्व आल्यास ७५ हजार, अपघातामुळे दोन डोळे वा एक डोळा, एक अवयव निकामी झाल्यास ३७ हजार ५00 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे.
ही योजना दारिद्रय़ रेषेखाली जन्मलेल्या प्रत्येक कुटुंबातील पहिल्या दोन अपत्यांसाठी लागू राहणार आहे. या योजनेत मुलीचे आई-वडील महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे बंधनकारक आहे. योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींचा साक्षरता दर व इतर सोयी, सुविधांसोबतच स्त्री-भ्रूणहत्येला पायबंद घालण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.


testadds

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..