Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, November 11, 2013

Online Computer Typing Examination in Maharashtra

Online Computer Typing Examination in Maharashtra 

Online Computer Typing Examination in Maharashtra


टायपिंग परीक्षेमध्ये होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी आता ही परीक्षा ऑनलाईन आणि पेपरलेस घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासंदर्भात ३१ ऑक्टोबरला अध्यादेश जारी केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १ डिसेंबरपासून राज्यात होणार आहे. राज्यातील तीन हजार केंद्रावर होणार आहे. ऑनलाईन परीक्षेमुळे अनधिकृतपणे चालणार्‍या टायपिंग इन्स्टिट्युटलाही आळा बसणार आहे.
या संदर्भात परीक्षा परिषदेने तयार केलेल्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली. त्यामध्ये चार अभ्यासक्रमांचा समावेश असून त्यात बेसिक कोर्स इन कॉम्पुटर टायपिंग - मराठी व इंग्रजी (३0 व ४0 शब्द प्रतिमिनीट) कालावधी सहा महिने, स्पेशल स्कील इन कॉम्पुटर टायपिंग फॉर इन्स्ट्रक्टर ऑन स्टुडंट (कालावधी तीन महिने) अशा अभ्यासक्रमाचा समावेश आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून राज्यातील तीन हजार टायपिंग इन्स्टिट्युटमध्ये पेपरलेस टायपिंग परीक्षा होणार आहे. यामुळे अनधिकृतपणे चालणार्‍या प्रशिक्षण संस्थांना आळा बसेल आणि विद्यार्थ्यांची फसवणूकही थांबणार आहे. काळाच्या ओघात संगणकाच्या 'की-बोर्ड'ने टाईपरायटरला मागे टाकले. 
काही कंपन्यांनी यंत्राची निर्मिती बंद केली. परंतु संगणक हॅकिंगच्या घटना व डाटा करप्ट होण्याच्या प्रकाराने महत्वाच्या दस्ताऐवजासाठी टाईपरायटरचा वापर केला जात आहे. टंकलेखनाला २0 व्या शतकात अतिशय महत्व होते. १९६६-६७ साली अकरावी, बारावीच्या अभ्यासक्रमात टायपिंगचा समावेश होता. राज्यात टायपिंग शिकविणार्‍या तीन हजार इन्स्टिट्युट असून त्यावर दहा हजार कुटुंब अवलंबून आहे. या संस्थांमधून तीन लाख विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. 
संगणकाच्या वापराने एमएससीईटीचे अभ्यासक्रम आवश्यक झाले. मात्र नोकरभरतीत टंकलेखन तेवढेच आवश्यक आहे. ई-गव्हर्नन्स पद्धत अवलंबिण्यात येत असल्याने संगणकीय टंकलेखन सराव असलेले कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे आधुनिक काळात संगणकीय टंकलेखन आवश्यक होणार आहे. कर्नाटक सरकारने संगणक टंकलेखन अभ्यासक्रम २00९ पासून सुरू केला आहे. हीच परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा परिषदेने संगणक टंकलेखन अभ्यासक्रम तयार केला. शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला.
शासनाने सर्वबाबी लक्षात घेऊन या प्रस्तावाला मान्यता दिली


No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..