ResultsHub.Net
महाराष्ट्र शिष्यवृत्ती जिल्हानिहाय पात्रता धारकांची यादी 2014 | Poly Admission DTE Final Merit List 2014 | B.Ed. Summer 2014 Result RTMNU | BE 6th Sem Summer 2014 Result RTMNU | RTMNU BE First Year Summer 2014 Result | RTMNU BE 7th Sem Result Summer 2014 | RTMNU Todays Summer 2014 Result

Search Any Result / Job :

Saturday, June 1, 2013

MHADA Lottery Result 2013 Online, Winner List, Waiting List

MHADA Lottery Result 2013 Online, Winner List, Waiting Listमुंबईत घर झाल्याचा आनंद काय असतो ते आज म्हाडा सोडतीनंतर घर लागलेल्या १२४४ भाग्यवंतांच्या चेहर्‍याकडे पाहिल्यानंतर लक्षात आले.
मुंबई मंडळाच्या वतीने या वर्षी काढण्यात आलेली अत्यल्प घरे व त्यांच्या किमती जास्त असल्याने ही सोडत महिनाभरापासून चर्चेचा विषय बनली होती. मात्र, आजचा मुख्य दिवस योग्य नियोजन व सोडतीतील पारदश्रीपणामुळे सुरळीतपणे पार पडला.सकाळी साडेदहाच्या सुमारास सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर ३ पंचांच्या उपस्थितीत संगणकीय सोडत काढण्यास सुरुवात झाली. पहिल्यांदा योजना क्रमांक २८९ मागाठाणे येथील अल्प उत्पन्न गटातील ६२ घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली. विविध संवर्ग व सर्वांत शेवटी सर्वसाधारण गटातील विजेत्यांची नावे जाहीर केली जात होती. सोडतीत यशस्वी ठरणार्‍यांना व्यासपीठावर बोलावून मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जात होता. पहिल्या सत्रात २८९, २९0, २९२, २९३, २९४, २९६, २९७, २९८, ३0१, १४८ब, २३९अ या १३ संकेत क्रमांक योजनांची सोडत जाहीर टप्प्याटप्प्याने करण्यात आली. त्यानंतर दुपारच्या सत्रात उर्वरित १२ योजनांचे निकाल घोषित करण्यात आले. या वर्षीच्या सोडतीसाठी पहिल्यांदाच ऑनलाइन पेमेंट, त्याचप्रमाणे मोबाइलवर मेसेज, ईमेलद्वारे अर्जदारांना माहिती पुरविली जात होती. त्यामुळे अर्जदारांनी सोडत स्थळाकडे पाठ फिरवली. सर्व योजनांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांची माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली. 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..