Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Sunday, May 11, 2014

Zero Shadow Day At Pune On 14 May 2014

Zero Shadow Day At Maharashtra & Pune 2014

Zero Shadow Day At Maharashtra & Pune 2014
Zero Shadow Day - see yourself without a shadow on Monday (May 13), which is the ‘Zero Shadow Day’. Your shadow will disappear at 12.31 pm Indian Standard Time. येत्या बुधवारी काही काळासाठी आपली सावली आपली साथ सोडणार आहे. हो, त्या दिवशी सूर्य बरोबर डोक्यावर येणार असल्याने पुणेकरांना आपली सावली दिसेनाशी झाल्याचा अनुभव घेता येईल. बुधवारी पुण्यात 'झिरो श्ॉडो डे' आहे.
उत्तरायण-दक्षिणायनामुळे २१ मार्च व २३ सप्टेंबर रोजी ज्या वेळी सूर्य खगोलीय विषुववृत्त पार करतो. यानंतर उत्तरेला प्रवास करताना सूर्य पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाच्या अक्षांशाइतक्या अंशांवर आला, की त्या दिवशी त्या ठिकाणी सूर्य स्थानिक वेळेनुसार १२ वाजता डोक्यावर येतो. तो दिवस त्या ठिकाणासाठी 'झिरो श्ॉडो डे' किंवा बिनसावलीचा दिवस म्हणून ओळखला जातो, अशी माहिती ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे सचिव डॉ. सागर गोखले यांनी दिली.
पुण्याचे अक्षांश १८.५ अंश असल्याने सूर्य उत्तरेला प्रवास करत १४ मे रोजी मध्यावर येईल. या दिवशी पुण्यात १२ वाजून ३१ मिनिटांनी सावली काही काळासाठी दिसेनाशी होईल. सूर्य २१ जुनपर्यंत कर्कवृत्तापर्यंत प्रवास करून दक्षिणेला परत फिरला, की जुलैमध्ये पुन्हा अशी घटना घडते. झिरो श्ॉडो डे : टिळक स्मारक मंदिर येथे निरीक्षणाची संधी, उत्तरायणाचा परिणाम 
■ येत्या बुधवारी 'झिरो श्ॉडो डे'निमित्त झिरो श्ॉडोचे तसेच दुर्बिणीतून सौर डागांचे निरीक्षण करण्याची संधी परिसंस्थेने टिळक स्मारक मंदिराच्या आवारात उपलब्ध केली आहे. दुपारी १२ ते १ सर्वांना या ठिकाणी संधी मिळेल.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..