Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Sunday, January 5, 2014

Class 5th, 8th, 11th Online Admission Process in Maharashtra

Class 5th, 8th, 11th Online Admission Process in Maharashtra



प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आता इयत्ता पाचवी, आठवी व ११ वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक सत्रापासून होण्याची शक्यता असून यासाठी राज्याचा शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी गंगाधर जाधव यांनी दिली आहे. 
स्थानिक मुंगसाजी विद्यालयात शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शिक्षणाधिकारी जाधव पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी मानव विकास मिशन अंतर्गत ज्या योजना सुरु आहेत, त्याबाबत मुख्याध्यापकांना उदासीनता न दाखविता सहकार्यशील राहावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी म्हटले. 
याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी भाऊ चव्हाण, भाऊ वसावे, शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश निकम, भाऊ वड्डे, भाऊ मडावी, पुसदचे गट शिक्षणाधिकारी संजय कांबळे, मुख्याध्यापक सुधाकर ठाकरे, प्राचार्य साधना बंडेवार आदींची उपस्थिती होती.
सभेच्या यशस्वीतेसाठी भाऊ इंगळे, राजाराम चव्हाण व इतर शिक्षकांनी सहकार्य केले. या सभेला पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..