Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, September 6, 2013

Maharashtra Police Fauzdar Recruitment 2013 Exam Result Soon before 12 September 2013

Maharashtra Police Fauzdar Recruitment 2013 Exam Result Soon before 12 September 2013

Police Department Recruitment August, September 2013 Exam Result | Result Date of Maharashtra police Recruitment | Result Download Maharashtra police Recruitment 2013.

फौजदार पदाच्या ११४0 जागांसाठी घेण्यात आलेल्या खात्यांतर्गत परीक्षेचा निकाल १२ सप्टेंबरपूर्वी जाहीर केला जाणार आहे. 
३0 ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा सर्व परिक्षेत्रीय मुख्यालयी घेतली गेली. राज्यात सुमारे २८हजार पोलीस कर्मचार्‍यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचे तीन पेपर घेतले गेले. यातील प्रत्येकी ७0गुणांच्या पेपरची तपासणी परिक्षेत्रीय स्तरावर तर ३0गुणांच्या पेपरची तपासणी मुंबई स्तरावर होणार आहे. परिक्षेत्रीय पेपर तपासणीचे निकाल लागले आहेत. मात्र मुंबईतील निकाल जाहीर व्हायचे आहेत. १२ सप्टेंबरपूर्वी हे निकाल जाहीर केले जाणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण) अमिताभ गुप्ता यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. फौजदाराच्या जागा वाढविण्यात आल्याचे बोलले जात असले तरी या कार्यालयाने याबाबत इन्कार केला आहे. जुन्याच जागा कायम असल्याचे कार्यालय सूत्राने सांगितले. मोठय़ा प्रमाणात उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांच्या अंतिम निवडीचा निकष काय हे अद्याप स्पष्ट नाही. सेवा ज्येष्ठता हा निकष आधी ठरविला गेला होता. मात्र त्यात फेरबदल करण्याचा विचार महासंचालक कार्यालय स्तरावर सुरू असल्याची माहिती आहे. उपरोक्त जागा परिक्षेत्र स्तरावरील रिक्त पदांची स्थिती पाहून भरल्या जाणार आहेत. शक्यतोवर पोलीस कर्मचार्‍यांना आपल्याच परिक्षेत्रात नेमले जाणार आहे. तेथे रिक्त पदे नसतील तर जवळच्या परिक्षेत्रामध्ये नेमले जाईल. अमरावती परिक्षेत्रात २२00पैकी दीड हजारावर पोलीस कर्मचारी प्रत्येकी ७0गुणांची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समजते. फौजदार परीक्षेसाठी सेवा ज्येष्ठता (ज्याची सेवा कमी उरली त्याला प्राधान्य) हा निकष लावला गेल्यास तरुण पोलीस कर्मचार्‍यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी अभ्यासासाठी सुट्या घेऊन तयारी केली होती. सेवा ज्येष्ठता हा निकष लागल्यास या तरुण पोलीस कर्मचार्‍यांना उत्तीर्ण होऊनही प्रत्यक्ष फौजदार होण्यासाठी आणखी बरेच वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे.


No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..