Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, March 4, 2016

Mumbai University E-MBA 2016 Application Form & Details

Mumbai University E-MBA 2016 Application Form & Detailsमुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच ऑनलाइन ई-एमबीए (ऑनलाइन एक्झिक्युटीव्ह मास्टर ऑफ बिझनेस अँडमिनिस्ट्रेशन) हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि रशियाच्या फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ ओराल यांच्यात गुरुवारी यासंदर्भातील सामंजस्य करार झालाआहे.
विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेमार्फत हा अभ्यासक्रम राबविला जाणार असून, या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. यात एकूण १0४ क्रेडिट्स विभागून ठेवले जाणार आहेत. इतर देशातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे क्रेडिट स्वीकारण्याची मुभा या अभ्यासक्रमात दिली जाणार आहे. हा अभ्यासक्रम संपूर्णत: चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमवर आधारित आहे. या २वर्षीय अभ्यासक्रमामध्ये एक वर्ष हा डिप्लोमा म्हणजेच पदविका या स्वरूपात असेल, तर पूर्णवेळ अभ्यासक्रम केल्यास २वर्षीय एमबीए ही पदवी दिली जाणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर या अभ्यासक्रमासाठी पात्र असेल. 

1 comment:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..