Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Sunday, November 1, 2015

Nagpur University Winter 2015 Hall Tickets Download

Nagpur University Winter 2015 Hall Tickets Download


RTMNU Download Link of Hall Tickets BA, BCom ,bSc, BCA, BBA, MCA, MBA, BE, BTech. From following given links. Enter your Seat Number & Download the Hall Tickets / Admit Cards From given link. 


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या दुसर्‍या टप्प्यात विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. वेळेत परीक्षा प्रवेशपत्र 'डाऊनलोड'च न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसताच आले नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.यासंदर्भात विद्यापीठ व महाविद्यालय प्रशासनाकडून एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करण्यात येत आहे. परंतु या सर्वात विद्यार्थ्यांना नाहक मन:स्तापाचा सामना करावा लागत आहे. हिवाळी परीक्षांपासून विद्यापीठाने 'ऑनलाईन' परीक्षा अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रदेखील 'ऑनलाईन'च पुरविण्यात आले. ही प्रवेशपत्रे महाविद्यालयांच्या 'लॉगिन'मध्ये पुरविण्यात आली. विद्यापीठाच्या दुसर्‍या टप्प्यात पदव्युतर अभ्यासक्रमातील परीक्षांचा समावेश करण्यात आला आहे. शनिवारपासून या परीक्षांना सुरुवात झाली. मात्न गेल्या पाच दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशपत्नासाठी रांगा लागल्या होत्या. परंतु अखेरच्या क्षणापर्यंत अनेक महाविद्यालयांमध्ये प्रवेशपत्रे 'डाऊनलोड'च झाली नाहीत. पेपरचा वेळ सकाळी ९.३0 चा असताना काही विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे चक्क ११.३0 वाजता 'डाऊनलोड' झाली. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. जबाबदार कोण?/२ विद्यार्थ्यांबाबत अनिश्‍चितता कायम कुठलाही दोष नसताना अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले. यासाठी जबाबदार कोण याचा शोध लागेल तेव्हा लागेल. परंतु या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार का व त्यांना दिलासा मिळणार का हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..