Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Sunday, October 18, 2015

Nagpur University Winter 2015 Exam Admit Cards, Hall Tickets

Nagpur University Winter 2015 Exam Admit Cards, Hall Tickets


RTMNU Winter 2015 Hall Tickets, Admit Cards


 हलगर्जीपणाचा विद्यार्थ्यांना फटका नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना सोमवार १९ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या परीक्षांसाठी प्रवेशपत्र 'ऑनलाईन' स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. परंतु अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रच 'डाऊनलोड' होत नसल्याने महाविद्यालयांचे कर्मचारी हैराण झाले आहेत. परीक्षेला अवघे तीन दिवस शिल्लक असताना विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासाठी पायपीट करावी लागत आहे.
नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांसाठी परीक्षा विभागाने 'एमकेसीएल'सोबत जोरदार तयारी सुरू केली आहे. 'एमकेसीएल'तर्फे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर 'ऑनलाईन' प्रवेशपत्र 'अपलोड'देखील करण्यात आले. महाविद्यालयांच्या 'लॉगिन'मधून विद्यार्थ्यांना ते उपलब्ध होणार होते. परंतु काही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रेच नसल्याचे दिसून आले. त्यानंतर महाविद्यालयांनी तातडीने परीक्षा विभागात धाव घेतली व तांत्रिक कारणांमुळे ही ओळखपत्रे दिसत नसल्याचे स्पष्ट झाले. अनेक विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रात चुकीचे विषय किंवा चुकीची माहिती नमूद असल्याची तक्रारदेखील महाविद्यालयांकडून करण्यात येत आहे. अवघ्या तीन ते चार दिवस अगोदर हा प्रश्न समोर आल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो आहे. महाविद्यालयांच्या प्रतिनिधींसोबत विद्यार्थीदेखील दररोज परीक्षा भवनात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता अशा काही घटना समोर आल्याचे त्यांनी मान्य केले. परंतु संबंधित त्रुटी या विद्यार्थी व महाविद्यालयांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा दावा त्यांनी केला. 'ऑनलाईन' माहिती 'अपलोड' करताना विद्यार्थ्यांनी चुकीचे विषय किंवा अयोग्य माहिती भरली. त्यामुळे त्यात चूक उमटली असे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..