Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Thursday, March 5, 2015

Maharashtra RTE Admission 2015 Phase 2 Details, Support Centre

Maharashtra RTE Admission 2015 Phase 2 Details, Support Centre


'आरटीई'अंतर्गत (राईट टू एज्युकेशन)प्रवेशाच्या प्रक्रियेचा महत्त्वाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. प्रवेशासाठी 'ऑनलाईन' अर्ज करण्यासाठी २ तारखेपासून सुरुवात झाली असून, यासाठी पालकांची गर्दी होत आहे. परंतु शहरातील काही 'सपोर्ट सेंटर'वर पालकांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे अनेक पालक संभ्रमात असून, अपूर्ण अर्ज भरण्यात येत आहेत.

आरटीई प्रवेश प्रक्रियेस १६ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. १ मार्चपर्यंत शाळांची नोंदणी प्रक्रिया चालली. आता १७ मार्चदरम्यान पालकांना 'ऑनलाईन' अर्ज करता येणार आहे. 'आरटीई'अंतर्गत वंचित घटकांतील विद्यार्थी येत असल्याने अनेक पालकांना तर इंटरनेट तसेच 'ऑनलाईन' प्रक्रियेची फारशी माहिती नाही. त्यामुळे शिक्षण विभागातर्फे शहरात २५ 'सपोर्ट सेंटर' उघडण्यात आले आहेत. परंतु काही ठिकाणी योग्य मार्गदर्शन करण्यात येत नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे. जर कुठल्या 'सपोर्ट सेंटर'वर हलगर्जीपणा होत असेल तर त्याची तपासणी करण्यात येईल व पालकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली. 'सपोर्ट सेंटर'ची वेळ ११ ते ५.४५ राहणार आहे. गुरुवारी मात्र 'सपोर्ट सेंटर' सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत कार्यरत असतील.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..