Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Thursday, March 5, 2015

IIM Nagpur July 2015 Admission Details

IIM Nagpur July 2015 Admission Details


IIM Nagpur 2015 Admission Procedure & Application procedure is given below. Read all details carefully & go through the given important links given below.

राज्यातील पहिल्यावहिल्या 'आयआयएम-नागपूर'मध्ये (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) जुलै महिन्यापासूनच प्रवेश सुरू होणार असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. बुधवारी 'आयआयएम -अहमदाबाद'च्या त्रिसदस्यीय पथकाने मिहान व 'व्हीएनआयटी' येथील जागेची पाहणी केली. येत्या महिन्यातच येथे आवश्यक असणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पथकाच्या निर्देशानुसार हव्या असलेल्या सर्व सोयीसुविधा 'व्हीएनआयटी'त उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 'आयआयएम-अहमदाबाद'कडे नागपूरमधील संस्थेचे पालकत्व देण्यात आले आहे.
बुधवारी उपराजधानीत आलेल्या या पथकात आयआयएम अहमदाबादचे मुख्य प्रशासकीय अधिकारी मनोज भट यांच्यासोबत प्रा. पांडे व प्रा. वाड्रा यांचा समावेश होता. त्यांनी सर्वात अगोदर 'व्हीएनआयटी'च्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर मिहान येथील २00 एकर जागेला पथकाने भेट दिली. त्यानंतर या पथकाने 'व्हीएनआयटी'च्या 'गव्हर्निंग कौन्सिल'चे अध्यक्ष विश्राम जामदार, संचालक डॉ. नरेंद्र चौधरी, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे तसेच केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियता नरेंद्र कुमार यांच्यासोबत सखोल चर्चा केली. यावेळी 'व्हीएनआयटी'त उपलब्ध असलेल्या व आवश्यक असणार्‍या सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. इमारतीचे महत्त्वदेखील यावेळी पथकाला पटवून देण्यात अधिकार्‍यांना यश आले. संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे सुरू व्हावी यासाठी एक प्रशासकीय आणि एक शैक्षणिक अधिकारी नागपुरात पाठविण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..