Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, February 23, 2015

Class 4th, Class 7th Scholarship Exam 2015

Class 4th, Class 7th Scholarship Exam 2015


इयत्ता ४ थी व ७ वी मध्ये घेण्यात येणार्‍या शिष्यवृत्ती परीक्षेत मोहाडी तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत यावे यासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग मोहाडी तर्फे बोर्डाच्या परीक्षेच्या धरतीवर 'सराव परीक्षा' घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
पूर्वी प्रत्येक शाळेत परीक्षा घेतल्या जायच्या त्यासाठी पंचायत समिती स्तरावर सामान्य वार्षिक परीक्षा मंडळ स्थापन करण्यात आले होते.
या मंडळात सदस्य असलेल्या शाळेकरिता निधी उपलब्ध होता. मात्र आर.टी.ई. कायद्यामुळे असे परीक्षा मंडळे विसजिर्त करण्यात आले. शिक्षण विभाग, पंचायत समिती मोहाडी येथील त्या परीक्षा मंडळात जवळपास ९३ हजार रुपये जमा होते. मात्र हा परीक्षा मंडळच बंद केल्याने त्या निधीचा उपयोग विद्यार्थ्यांसाठीच करावा असे काही मंडळ सदस्यांचे मत होते. त्यासाठी येथील गटशिक्षणाधिकारी यांनी सहमती दर्शविल्याने माजी मंडळ सदस्य, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, सर्व केंद्र प्रमुख यांच्या सहमतीने शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्व तयारी म्हणून सर्व सदस्य शाळांमध्ये सराव परीक्षा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी त्या सर्व शाळांना प्रत्येकी एक नवनीत प्रश्नसंच सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक केंद्रस्तरावर प्रत्येकी दोन दरी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सराव परीक्षा घेण्यात येणार असल्याने परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या मनातून परीक्षेबद्दलची भीती निघण्यास मदत होईल तसेच उत्तरे कशी सोडवावी, वेळेचे बंधन कसे पाळावे हे त्यांना अवगत होईल.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..