Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Sunday, February 8, 2015

Anganwadi Sevika Bharti 3500 Posts Recruitment 2015

Anganwadi Sevika 2015 Bharti 3500 Posts Recruitment


Anganwadi Sevika Recruitment Maharashtra is under process. Under this Recruitment there will be Approximately 3500 Vacant Posts. Currently under this Recruitment 249 Posts are there. All details regarding this recruitment are given below in Marathi. 

 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रकल्प अधिकारी आणि सहायक प्रकल्प अधिकार्‍यांची २४९पदे रिक्त असल्याची माहिती आहे.योजनेवर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्यासाठी ही पदे महत्त्वाची ठरत असताना गेल्या काही वर्षांपासून पद भरतीची प्रक्रिया थंडावली आहे. चांदूरबाजार : आरोग्य यंत्रणा आणि महिला, बालके यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या नियुक्त्यांच्या संदर्भात अजूनही चालढकल सुरूच असून राज्यात अंगणवाडी सेविकांची ३ हजार ५३२ आणि मदतनिसांची ५ हजार २२२ पदे रिक्त आहेत.
बाल्यावस्थेतील मुलांच्या वाढ व विकासाच्या टप्प्यात पुरेसा आरोग्य, आहार व शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून देशभरात अंगणवाड्यांचे जाळे विकसित करण्यात आले आहे.गरीब कुटुंबातील माता आणि मुले यांच्यासाठी असलेली ही योजना गावपातळीपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न झाले. केंद्र सरकारने महाराष्ट्रात एकूण १ लाख १0हजार ४८६अंगणवाड्या मंजूर केल्या आहेत.त्यापैकी १ लाख ७ हजार ११३सध्या कार्यरत आहेत.या अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून दरवर्षीकोट्यवधींचा निधी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानातून खर्च केला जातो.शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील बालमृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, मुख्यत्वे बालकांच्या पोषण आणि आहाराविषयक दर्जात सुधारणा व्हावी हा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा उद्देश आहे.मात्र सध्या अंगणवाडी केंद्रांमध्ये सेवा पुरविणार्‍या कर्मचार्‍यांकडे होत असलेले दुर्लक्ष चर्चेत आले आहे. राज्यातील १ लाखावर असलेल्या अंगणवाडी केंद्रांवर ६१ लाख २६ हजार बालकांना सांभाळण्याची जबाबदारी आहे.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..