Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, October 10, 2014

barti.maharashtra.gov.in - BARTI Cast Validity Status 2014 - 2015 Tracking Online

barti.maharashtra.gov.in - BARTI Cast Validity Status 2014 - 2015 Tracking Online

BARTI Cast Validity Status 2014 - 2015
DECIDED CASES, PENDING CASES Details are given below, check all details carefully. Also  Please click on below link to access Caste Certificate Verification Information System details also given on this page. Also related links are given below. Check the details carefully Also go through the links given below.

DECIDED CASES PENDING CASES
Service(Govt./Semi Govt. Employees) Decided Cases Service(Govt./Semi Govt. Employees) Pending Cases
Students Decided Cases Students Pending Cases
Election Decided Cases Election Pending Cases
Other Decided Cases Other Pending Cases


विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. १, कोकण भवन, नवी मुंबई समितीमार्फत सेवा, शैक्षणिक व निवडणूक या विभागातील तयार जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप दिनांक ११, १२ व १३ ऑक्टोबर २0१४ या दिवशी कोकण भवन, ५ वा मजला, बेलापूर, नवी मुंबई येथे करण्यात येईल. निकाली प्रमाणपत्रांची यादी (उदा. अर्जदाराचे नाव, जात, लॉट क्रमांक, वैधता प्रमाणपत्राचा क्रमांक इ.) बार्टी संस्थेच्या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आली आहे. वाटपासाठी उपलब्ध असलेल्या वैधता प्रमाणपत्राची संख्या ६२२९ इतकी आहे. अर्जदार यांनी बार्टीसंस्थेच्या http://barti.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देवून DECIDED CASES या शीर्षकाखाली वैध ठरविलेल्या अर्जदारांची यादी पहावी. निकाली प्रकरणांचे यादीत आपले नाव कसे शोधावे याबाबत संस्थेच्या वरील वेबसाईटवर ``Guidelines to search Decided cases" या लिंकवर क्लिक करावे.
वैध प्रकरणांची यादी दि. १५ सप्टेंबर २0१४ पासून बार्टी, संस्थेच्या वर नमूद केलेल्या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आली आहे.
ज्या अर्जदारांची प्रकरणे समितीकडून वैध ठरविण्यात आली आहेत व मोबाईल क्रमांक अर्जावर नोंदविला आहे, अशा अर्जदारांना समिती कार्यालयाकडून SMS पाठविण्यात आले असून पात्र उमेदवारांनी त्यांचे नाव, लॉट क्रमांक व वैधता प्रमाणपत्र क्रमांक (Validity Certificate Number) इ. माहिती घेऊन वितरणाचे दिवशी वैधता प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी सोबत स्वत:चे ओळखपत्र घेऊन वैयक्तिकरीत्या हजर राहावे. ज्या अर्जदारांना व्यक्तीश: हजर राहता येणार नाही, अशा अर्जदारांनी त्यांचे रक्तनाते संबंधातील व्यक्तीला अधिकारपत्र, ओळखपत्र इ. पुरावे घेऊन पाठविल्यास, खात्री पटल्यानंतरच अधिकारपत्रधारक व्यक्तीस वैधता प्रमाणपत्र हस्तांतरित करण्यात येईल.
नमूद करण्यात येते की, 'वैधता प्रमाणपत्र' सोबतच ज्यांची मूळ प्रमाणपत्रे समितीकडे सादर आहेत ती जातीचे 'मूळ प्रमाणपत्र'सुद्धा देण्यात येणार असल्याने त्रयस्त कोणत्याही व्यक्तीकडे सदरची कागदपत्रे दिली जाणार नाहीत, याची कृपया सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.
अर्जदारांना आवाहन करण्यात येते की, जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र हे त्यांचे भविष्याचे दृष्टीने अमूल्य असून त्याची जबाबदारी त्रयस्थ व्यक्ती, मध्यस्थ, दलाल अथवा ओळखीच्या व्यक्तींवर सोपवू नये. वैधता प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी स्वत: उपस्थित राहावे. येताना ओळखपत्र, जातीच्या प्रमाणपत्राची प्रमाणित (Photo Copy) छायाप्रत सोबत आणावी. म्हणजे सुलभरीत्या वैधता प्रमाणपत्र वितरित करता येईल. वैधता प्रमाणपत्र वाटपाचे नियोजन करण्यात आले असून प्रमाणपत्रांचे वाटप खिडक्यांवर/ टेबलावर करण्यात येईल. लॉट क्रमांक व खिडकी क्रमांक इ. माहिती कार्यालयाचे आवारात नोटीस बोर्डवर ठळकपणे प्रदर्शित करण्यात येईल. सबब सर्वअर्जदार यांनी त्यांचे प्रकरणाबाबतची माहिती वेबसाईटवर पाहून, तसेच SMS संदेशप्राप्त झाल्यानंतर खात्री करून कोकण भवन (तळमजला), बेलापूर, नवी मुंबई येथे, वाटपाचे दिवशी उपस्थित राहावे. वैधता प्रमाणपत्राचे वाटपासाठी समिती सज्ज असून समिती कार्यालय वरील दिवशी सकाळी ९.00 ते सायंकाळी ६.00 या वेळेत खुली राहील.
(श्रीम. सलिमा तडवी) (श्री. राजेंद्र गोसावी) (श्री. गौतम जो. रसाळ)
सदस्य सचिव सदस्य अध्यक्ष
डी जी आय पी आर २0१४/२0१५/३५५९ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
(सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था)
२८ क्वीन्स गार्डन, पुणे — ४११00१.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..